मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव रोडवरील पांझन नदी व दहेगाव वरून येणारी नदी दोघीचा संगम आहे पुलाजवळ संरक्षण कठड्याचा अभाव असून, येत्या पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना (शिंदे गट) चे मनमाड उपशहर प्रमुख संजय दराडे यांनी या मुद्द्यावर आवाज उठवला असून, प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संजय दराडे म्हणाले, “या भागातून शाळकरी विद्यार्थी, शेतकरी व सामान्य नागरिक रोजच प्रवास करतात. पावसाळ्यात पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे जीवितहानी होण्याचा धोका अधिक आहे. प्रशासनाने या ठिकाणी संरक्षण कठडा उभारावा, अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा संजय दराडे यांनी दिला आहे.














