मनमाड –
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत मनमाड शहर युवासेनेच्या विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
या मध्ये प्रभाग क्रमांक ३ उपशहरप्रमुख – सचिन (बंटी) आव्हाड, प्रभाग क्रमांक १ सागर केकान – विभागप्रमुख, प्रभाग क्रमांक ५ सुमेध बागुल – शहर संघटक, प्रभाग क्रमांक ६ मंदार चौधरी – शहर संघटक, राहुल (सोनू) कापडे – विभागप्रमुख, प्रभाग क्रमांक ११ पुष्कर देशपांडे – उपविभागप्रमुख, प्रभाग क्रमांक १२ ललित मोतीयानी – उपशहरप्रमुख, किरण आहेर – विभागप्रमुख, प्रभाग क्रमांक १५ अनिकेत पवार – शहर संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्वांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या , आपले मनोगत व्यक्त करताना सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना हे कुटुंब आहे आणि कुटुंबाचे पदाधिकारी होत असताना आपल्या वार्डात आपल्या प्रभागात समाजाची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे असे समजूनच काम करावे असेही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सागर हिरे, शिवसेना मनमाड शहर प्रमुख योगेश इमले, आसिफ शेख, लाला नागरे, सुभाष माळवतकर, लोकेश साबळे, स्वराज वाघ तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदगावला युवासेनेच्या शिलेदारांच्या नियुक्त्या
नांदगाव - रविवार ११ मे रोजी कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेना युवासेना...