राजगिर बिहार येथे सुरू असलेल्या ७ व्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या साईराज परदेशी याने ऐतिहासीक कामगिरी करीत स्नॅच मध्ये १४० किलो क्लीन जर्क मध्ये १७२ असे ३१२ किलो वजन वजन उचलत तीन नवीन राष्ट्रीय विक्रम स्थापित केले असून मागच्या वर्षी चा स्वतःचाच राष्ट्रीय १ किलोने मोडीत काढत घवघवीत यश संपादन केले आपल्या सलग तिसऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये साईराज ने पदक प्राप्त केले २०२३ इंदोर येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत कांस्यपदक २०२४ चेन्नई येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये सुवर्णपदक व आज राजगीर बिहार येथे सुरु असलेल्या स्पर्धेत तीन नवीन राष्ट्रीय विक्रमांसह सुवर्णपदक नुकताच बारावी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला साईराज आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण पतियाळा येथे कसून सराव करीत आहे
साईराज ला छत्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर डी डी शर्मा अलोकेश बरुवा यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी बी एस कुलकर्णी प्रसाद पंचवाघ उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले














