मंगळवार दिनांक २०/५/२०२५ रोजी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष कॉ.डी.एल.कराड यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत कामगार संघर्ष समितीच्या वतीने विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, नाशिकरोड कार्यालयावर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. नगरपरिषद, नगरपंचायत कामगारांच्या प्रलंबित मागण्या तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायत कामगार संघर्ष समितीचे मुख्य संघटक ॲड. कॉ. संतोष पवार व उत्तर महाराष्ट्र नगरपरिषद कामगार कर्मचारी संघटना जनरल सेक्रेटरी कॉ.रामदास पगारे, यांचेवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाया मागे घेणे यासाठी हे आंदोलन आहे. कॉ.रामदास पगारे हे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत संघर्ष करीत असतात.
कॉ.रामदास पगारे व संतोष पवार हे प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी व त्यांचे बगलबच्चे दलाल यांच्या सांगण्यावरून मुख्याधिकारी मनमाड व उरण यांनी सुडबुद्धीने केलेली कारवाई मागे घेण्यात यावी. तसेच मुख्याधिकारी मनमाड व उरण मुख्याधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी व त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, या व इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
सोमवार दिनांक २६/५/२०२५ रोजी याच मागण्यांकरीता महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत कामगार संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक कॉ संतोष पवार ( उरण नगर परिषद) व उत्तर महाराष्ट्र राज्य जन- सेक्रेटरी. कॉ. रामदास पगारे (मनमाड नगरपरिषद ) हे आझाद मैदान मुंबई येथे अमरण उपोषणास बसणार आहेत. महाराष्ट्र शासनाचे मा.नगरविकास विभागाकडून कारवाई झालीच नाहीतर येत्या पावसाळी अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कामगार संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपरिषद नगरपंचायत कामगारांचा काम बंद आंदोलन करून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री, दोन्ही मा. उप मुख्यमंत्री, मा.नगर विकास मंत्री, मा.गृह मंत्री, मा.मुख्य सचिव, मा.संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मा.विभागीय आयुक्त, सर्व मा. जिल्हाधिकारी, सर्व महाराष्ट्र शासन, पोलीस प्रशासन यांना देण्यात आले असून मागण्यांबाबत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. असे