मनमाड – शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण कंपनी रोज सायंकाळी पासून रात्री 2 /3वाजे पर्यंत दोन दिवस तर रात्रभर मनमाड शहर चा वीज पुरवठा बंद ठेवत आहेत या अधिकारी व कर्मचारी च्या बेजबाबदार वागणूक मुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत म्हणून महा वितरण विभागीय कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी , जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे, शिवसेना जिल्हा संघटक नाना शिंदेभाजपाअल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अकबर शहा भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर,भाजपा शहर सरचिटणीस गौरव ढोले माजी नगरसेवक प्रमोद पाचोरकर भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद एळींजे भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कासार,नईम शेख आदी भाजपा शिवसेना प्रमुख पधादिकाऱ्यांनी धडक देत थेट अधिकाऱ्यांना जाब विचारला दोन लाख वस्ती चेमनमाड शहर हें वीज पुरवठा च्या अनियमित समस्या मधून जात असतांना मनमाड शहर महावितरण चे कार्यकारी अभियंता तडवी /सहायक अभियंता तळेले हें जबाबदार अधिकारी रजेवर असल्यामुळे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पाटील व सांगळे यांच्या वर पदाधिकाऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला या वीज वितरण कंपनी च्या हलगर्जीपणा मुळे मनमाड शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे /विवाह कार्य असतांना सर्वसामान्य नागरिकांना वीज खंडित झाल्या मुळे त्रास होतो आहे वीज खंडित केली त्यांचे कारण देण्यात येत नाही वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे बँका चे कामकाज वर प्रचंड परिणाम होत आहे/कधी पर्यंत दुरुस्ती होणार याची सूचना मिळत नाही अधिकारी व कर्मचारी उद्धट वागतात, फोन बंद ठेवतात या मुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत असे सांगत पदाधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून जाब विचारला या नंतर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी वरिष्ठ अधिकारी तडवी यांच्या शी फोन वर बोलणे करून या वीज च्या अनियमितता बाबत लेखी हमी मागितली त्यानुसार वीज महा वितरण कंपनी ने भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यां वीज पुरवठा नियमित होईल याचे हमी पत्र दिले नितीन पांडे नाना शिंदे,जयकुमार फुलवाणी, नारायण पवार संदीप नरवडे, प्रमोद पाचोरकर यांनी या अधिकाऱ्यांन शी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.