मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक,व्यापारी,तसेच घरातील वृद्ध,लहान लेकरं यांचे हाल हाल होत असून महावितरणचे अधिकारी कर्मचारी ठेकेदार यांच्या कामचुकार पणामुळे भर उन्हाळ्यातही मनमाडकरांना त्रास सहन करावा लागला आता पावसाळ्याच्या सुरवातीलाच कधी दोन कधी चार तर कधी आठ आठ तास वीज पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे मनमाड शहरात तसेच ग्रामीण भागात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे
महावितरणचे अधिकारी किंवा संबंधित ठेकेदार यांच्या निष्क्रियतेमुळे व नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे महावितरणच्या अशा गलथान कारभारामुळे या मनमाड शहरात या अंधाराचा फायदा घेऊन काही अनुचित प्रकार घडला किंवा कुठल्याही नागरिकास त्रास झाला तर यास सर्वस्वी महावितरण अधिकारी व संबंधित जबाबदार असतील
तसेच कायम खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यावर आठ दिवसाच्या आत कायमस्वरूपी तोडगा काढून वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्यात यावा अन्यथा मनमाड शहरातील सर्व वीज ग्राहक,सर्व राजकीय,अराजकीय,पक्ष संघटना यांना सोबत घेऊन
सर्वपक्षीय वीजग्राहक संघर्ष समिती च्या माध्यमातून तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असे आवाहन शिवसेनेचे तालुका सचिव शैलेश प्रकाश सोनवणे यांनी केले आहे

सेट झेवियर हायस्कूल ,मनमाड येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळावा संपन्न
मनमाड (वार्ताहर ) सेंट झेवियर हायस्कूल मनमाड, येथे नांदगाव तालुका स्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन...