loader image

छत्रे विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात

Jun 16, 2025


मनमाड येथील छत्रे विद्यालयात नविन शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव मोठया उत्साहात साजरा झाला.प्रदिर्घ उन्हाळ्याच्या सुट्याच्या नंतर सर्वच पालक व विद्यार्थ्यांना शाळा सुरु होण्याची प्रतीक्षा होती,ती अखेर संपली व नविन इयत्तेत,नविन मित्रांसमवेत शाळेत मुलं मोठया उत्साहाने दाखल झाली. या प्रसंगी शाळेच्या वतीने मुलांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प देत व त्याच्यावर पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले.शाळेचे कला शिक्षक निलेश जाधव व ठाकरे यांनी सुंदर असे रांगोळी चे रेखाटन केले.या प्रसंगी मनमाड नगर परिषदेचे माजी नगरसेवक छोटूभाऊ पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम दिंडोरकर,सचिव दिनेश धारवाडकर,जेष्ठ संचालक नाना कुलकर्णी,संचालक तथा पर्यवेक्षक प्रसाद पंचवाघ,शाळेचे मुख्याध्यापक प्रविण व्यवहारे,उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,जेष्ठ पर्यवेक्षिका सौ.संगिता पोतदार यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे तसेच चॉकलेट चे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पाखले यांनी तर आभार प्रदर्शन अशोक भोये यांनी केले.या वेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व मोठया संख्येने पालक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.