मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या पहिल्याच दिवशी विदयार्थ्यांना गुलाबपुष्प,चॉकलेट व समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठय – पुस्तके (इ. 5 वी ते इ. 8 वी ) देऊन स्वागत केले. उपस्थित पालक वर्ग व संस्थेचे सदस्या आयशा सलीम गाजियानी, शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे,पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते मोफत पाठ्य पुस्तके व गुलाब पुष्प,चॉकलेट देऊन विदयार्थ्यांचे स्वागत केले.तसेच संस्था व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे नविन प्रवेशित विदयार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थी मोठया संख्येने शाळेत उपस्थित होते. तसेच इ. 5 वी ते इ. 8 वी च्या विदयार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत व्हेज पुलाव सोबत गोड पदार्थ देण्यात आले.मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे यांनी सर्व विदयार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.संस्थेचे सदस्या आयशा सलीम गाजियानी व मुख्याध्यापक भूषण शेवाळे यांचे मार्गदर्शन लाभले.