loader image
[ays_poll id=7]

वाचन संस्कृती वाढावी म्हणून मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे ➖अभिनव उपक्रम

Jun 16, 2025

मरेमा विद्यालयात शाळेच्या प्रथम दिनी पुस्तके भेट देऊन विध्यार्थ्यांनचे केले स्वागत मनमाड – गत काही वर्षा पासून महाराष्ट्र मध्ये सर्वच शाळां मध्ये शालेय शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिनी विध्यार्थ्यांनचे स्वागत केले जाते पण यंदाही सलग दुसऱ्या वर्षी मनमाड शहरात वाचन,सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,साहित्य,क्षेत्रात अत्यंत जागरूक पणे व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन भरीव कार्य करणाऱ्या आणि 111 वर्षाची शतकोत्तर वाटचालीची परंपरा असणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाने नवीन पिढी मध्ये वाचन संस्कार निर्माण व्हावे, विध्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, व वाचन चळवळ वृद्धिंगत करणे साठी मनमाड शहरात शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मरेमा विद्यालय या शाळेच्या प्रथम दिनी विविध वाचनीय बाल साहित्य तील पुस्तके देऊन विध्यार्थ्यांन चे स्वागत केले या अभिनव कार्यक्रमाला मनमाड सार्वजनिक वाचनालया अध्यक्ष नितीन पांडे, राष्ट्रीय शिक्षण संस्थे चे अध्यक्ष विक्रम सप्रे, सचिव कल्पेश बेदमुथा जेष्ठ संचालक नरेशभाई गुजराथी माजी अध्यक्ष व प्रसिद्ध कवी प्रदीप गुजराथी, रा शिक्षण संस्थे चे सचिव पी. बी. कुलकर्णी सर,संचालक देवराम सदगीर,गुरुजीतसिंग कांत वाचनालय चे संचालक सुरेश शिंदे, उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट , मरेमा विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रफुल्ल देशपांडे, जेष्ठ शिक्षक हर्षद गद्रे अक्षय सानप आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते जेष्ठ शिक्षक हर्षद गद्रे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले सर्व मान्यवरांना च्या हस्ते 50 विध्यार्थ्यांचे प्रतिनिधिक स्वरूपात पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले मनमाड सार्वजनिक वाचनालय विध्यार्थ्यां साठी गेल्या 60 वर्षा पेक्षा जास्त काळात विविध आंतर शालेय निबंध, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करते आहे आजचा विध्यार्थी हा भविष्यात वाचक व्हावा आणि या वाचनाने देशाचा उत्तम नागरिक निर्माण व्हावा आणि सामाजिक व्यवस्थे वर अतिक्रमण करणाऱ्या सोशल मीडिया च्या काळात वाचन चळवळ जिवंत म्हणून या उपक्रमाचे आयोजन सलग दुसऱ्या वर्षी ही करण्यात आले असे मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे यांनी या प्रसंगी सांगितले दरवर्षी मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे मनमाड शहरातील वेगवेगळ्या शाळा मध्ये हा पुस्तके भेटी चा कार्यक्रम घेण्याचा मनोदय सचिव कल्पेश बेदमुथा यांनी व्यक्त केला विध्यार्थ्यांना भारतीय थोर राष्ट्र पुरुषांनची माहिती असणारे, इतिहास, गड किल्ले, पर्यावरण, संगीत, सुविचार,प्राणी पक्षी, क्रीडा ओळख,पालेभाजी ओळख,ऊर्जा,औषधी वनस्पती, आरोग्य, वृक्ष, विविध सण उत्सव,भाषण, लेखन कला,आदी विषयाची पुस्तके भेट देण्यात आली जेष्ठ शिक्षक हर्षद गद्रे सर यांनी सूत्रसंचालन केले तर मरेमा विद्यालय तर्फे विद्यालयाचे शिक्षक गोपीनाथ राठोड यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालया चे आभार ऋण व्यक्त केले यावेळी मरेमा विद्यालयातील चेतन सुतार,प्रवीण खरोळे,ज्योती चंदनशिव,के बी साळुंके, विजया हंडोरे,व्ही डी भामरे, वर्षा ठाकूर, राजेश पाटील, बी व्ही पाटील, शैलेश सोनवणे, आदी शिक्षक वृंद मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ नंदिनी फुलभाटी, मच्छिन्द्र साळी आदी मान्यवर सह मोठया संख्येने विध्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे व सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

[contact-field...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
.