मनमाड – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता.त्यानंतर विश्व योग दिन साजरा करण्यात येऊ लागला
भाजपा मनमाड शहर मंडलाच्या वतीने भारतीय संस्कृती चा गौरव दिन म्हणून संबोधले जाणाऱ्या अकराव्या आंतर राष्ट्रीय योग दिना निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला
भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन दराडे माजी नगर अध्यक्ष गणेश धात्रक, भाजपा जिल्हा चिटणीस नारायण पवार भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे , कामगार आघाडी जि. अध्यक्ष पंकज खताळ प्रसिद्ध क्रीडा प्रशिक्षक व छत्रे न्यू इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक प्रवीणजी व्यवहारे सर भाजपा मनमाड शहर सरचिटणीस आनंद काकडे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते सर्व प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतमाता प्रतिमा पूजन दीपप्रज्वलन करून योग अभ्यास कार्यक्रम चा शुभारंभ झाला योगप्रार्थना झाल्या नंतर प्रसिद्ध क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे सर , यांनी योग शास्त्र व योग दिनाचे अत्यंत अभ्यास पूर्ण आणि सोप्या भाषेत महत्व विषद केले, आणि योग शास्त्रतील 20 आसनांचा प्राथमिक अभ्यास प्रात्यक्षिक सह त मार्गदर्शन करून व्यवहारे सर यांनी उपस्थिततांन कडून करवून घेतला योग शिक्षक धनंजय भामरे आणि राष्ट्रीय खेळाडू कृष्णा व्यवहारे यांनी मार्गदर्शक योग आसन प्रात्यक्षिक मंचावर सादर केली या कार्यक्रमास भाजपा चे जेष्ठ उमाकांत राय, माजी नगरसेवक विजय मिश्रा ऍड सुधाकर मोरे व्यापारी आघाडी चे जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुनावतभाजपा दिव्यांग आघाडी चे दीपक पगारे,,सपतेश चौधरी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर ,,महिला मोर्चा सौ जयश्री कुंभार, सुनीता वानखेडे संजय गांगुर्डे,राजेश वाघेला, कैलास देवरे, डॉ डोंगरगावकर,ऍड शशिकांत व्यवहारे भैया घुगे सौ सांगळे आदी प्रमुख यांचे सह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमा चे संयोजन भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे, यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आनंद काकडे यांनी केले.