नांदगाव
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या सीएसआर निधीतून नांदगाव तालुका साठी दोन अध्यायावत रुग्णवाहिका भेट देण्यात आल्या.
या रुग्णवाहिकांचे लोकार्पण आमदार सुहास अण्णा कांदे व सौ. अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते आज नांदगाव येथील निवासस्थानी करण्यात आले.
याप्रसंगी नांदगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष जगताप उपस्थित होते.
सदर रुग्णवाहिका न्यायडोंगरी व बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत करण्यात आले आहेत.
यावेळी शिवसेना पदाधिकारी तसेच न्यायडोंगरी व बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी उपस्थित होते.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...