loader image

नांदगाव पंचायत समिती मध्ये कृषि दिन साजरा

Jul 3, 2025


नांदगांव : मारुती जगधने
राज्य शासन कृषि विभाग व पंचायत समिती नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त 1जुलै हा दिवस कृषि दिन म्हणून पंचायत समिती नांदगाव सभागृह येथे साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी .पी.एस.पाठक गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव हे होते.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती त विश्वास राव कवडे, तालुका अध्यक्ष अँग्रो डीलर असोसिएशन .रविंद्र डमाळे , तालुका कृषी अधिकारी , .झोळे,कृषि अधिकारी ,.सुरेश चौधरी कृषि अधिकारी पंचायत समिती.भट्टू वाघ, कृषि विस्तार अधिकारी पं स .विजु हेंबाडे, अध्यक्ष बाणेश्वर ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कं.लि., गंगाधरी येथील सुभाष जाधव, प्रगतीशिल शेतकरी कांदा उत्पादक व साठवणूक तंत्रज्ञान .त्र्यंबक नांगरे प्रगतशील शेतकरी अस्तगाव इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे हस्ते कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यांनतर .वैजनाथ राठोड प्रभारी मंडळ कृषी अधिकारी नांदगाव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांच्या उल्लेखनीय केलेल्या कार्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.त्यांनतर .रविंद्र डमाळे तालुका कृषी अधिकारी यांनी तालुक्यातील पिक पेरणी,पीक परिस्थिती तसेच मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण बाबत कृषि सल्ला व कृषी विभागाच्या विविध योजना संदर्भात मार्गदर्शन केले.यानंतर कवडे यांनी कृषि दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.तसेच कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी खरीप हंगामात कृषि विषयक राबविलेले विविध उपक्रमाचे महाकृषि अॅप मध्ये नोंदविल्याबद्दल त्यांचे मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच मका पिक स्पर्धा कार्यक्रमात विजेते शेतकरी.त्र्यंबक नागरे, अस्तगाव ,.सुभाष जाधव ,गंगाधरी यांचे मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तसेच उत्कृष्ट पध्दतीने सेंद्रिय शेती करणारे .विजू हेंबाडे,लोहशिंगवे व रेशीम शेती करणारे युवा उद्योजक .महेश शेवाळे ,जामदरी यांचा मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर .कार्यक्रमास उपस्थित असलेले शेतकरी सर्व अधिकारी, कर्मचारी,महिला यांचे.भटु वाघ कृषि विस्तार अधिकारी पंचायत समिती यांनी आभार मानले. त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी .एस.टी.कर्नर ,सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा व कृषी विभागाचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.