गुरु म्हणजे ‘मार्गदर्शक’ आणि पौर्णिमा म्हणजे ‘प्रकाश’ गुरु कडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते. गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरु हा असतोच. सर्वांच्या आयुष्यात प्रथम गुरु म्हणजे ‘आई’. कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते. आई आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते. सर्वात प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरू म्हणजेच आईकडून घेतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते. त्यानंतर वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपली गुरु असतात.
गुरुची महती थोर असते म्हणून लहानपणापासून आपल्याला ‘आचार्य देवो भव’ ही शिकवण दिली जाते गुरु अथवा शिक्षक हा देवाप्रमाणे असतो या शिकवणीमुळेच भारतात गुरुपौर्णिमा आजही मनापासून आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.
आई नंतर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक गुरुवर्य चरणी शतशः नमन,,,!
– फलक रेखाटन – देव हिरे.
(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर,संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)














