के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजर .”गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातूनज्ञानाच्या प्रकाशकडे घेऊन जातात “आषाढ महिन्याच्या पौर्णिमाला “गुरुपौर्णिमा” साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा हा सण गुरुबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्याचा दिवस आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. विश्वस्त धनंजय निंभोरकर. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती पूजन. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर उपस्थित होते .कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी केले. हिंदू आणि बौद्ध धम्मात मोठे उत्साहाने गुरुपौर्णिमा साजरी केली जाते .गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे देखील म्हणतात. कारण महर्षी व्यासांचा जन्म या दिवशी झाला होता .भारतात पुरातन काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे. ज्ञानप्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी सुद्धा गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. संपादन केलेल्या ज्ञानाच्या कृतज्ञतेचा एक दिवस म्हणून गुरुपौर्णिमा सर्वांनी आनंदात साजरी करावी. “जगात सर्व नात्याहून न्यारे असते नाते गुरु शिष्याचे झुकून नमन करतात सारे जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे” इयत्ता आठवीची अंतरा कोठावदे हिने आई-वडील पंख देतात त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात अशी भावना व्यक्त केली. व इयत्ता पाचवीच्या संस्कृती काकड हिने “अक्षर अक्षर हमे सिखाते शब्द शब्द का अर्थ बताते कभी प्यार से कभी दाट से जीवन जीना हमे सिखाते” अशा शब्दात गुरूंचे आपल्या जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. “दाटतो अंधार जेव्हा वाट दाखवी गुरु श्रेष्ठ कोणी ईश्वराहून ते म्हणजे आपले गुरु” इयत्ता पाचवीच्या आयुष सोनवणे यांने आपल्या भाषणातून गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .या सर्व विद्यार्थ्यांना सौ वैशाली झाल्टे. वैशाली शेजवळ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रावणी खैरनार हिने केले.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...