नाशिक (प्रतिनिधी) प्रत्येक व्यक्ती डोळसपणे समाजाकडे बघत असतो. दैनंदिन जीवन व्यवहारात वावरत असताना जी विसंगती दिसते तिला विनोदाची झालर दिली तर त्यातून वात्रटिकेचा जन्म होतो; असे प्रतिपादन मनमाड येथील कवी हेमंत वाले यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमात कवी हेमंत वाले ‘मनातले काही’ या आपल्या पुस्तकावर बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक सुहास टिपरे होते .हेमंत वाले पुढे म्हणाले की ,वात्रटिका लिहिताना राजकीय चर्चेतून अनेक मुद्दे सापडतात आणि तेच खाद्य वात्रटिकेसाठी महत्त्वाचे असते.कोणावरही टीका करता येत नाही पण वात्रटिकेच्या माध्यमातून प्रहार करण्याची संधी कवी शक्यतो सोडत नसतो.मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याची ताकद कवी आपल्या साहित्यात निर्माण करतो. त्यासाठी प्रसंग सावधानता बाळगली तर ते साहित्य समाज सुधारणेला प्रेरणा देते, असे सांगून त्यांनी काही वात्रटिका सादर केल्या. पोपट देवरे आणि राजेंद्र देसले या भाग्यवंत श्रोत्यांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर मधुकर गिरी यांनी आभार मानले.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...