. मनमाड – येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात 12 जुलै हा दिवस संपूर्ण जगभर पेपर बॅग दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवसाच्या औचित्य साधून एनसीसी विभागाच्या व 50 महाराष्ट्र बटालियन एनसीसी संभाजीनगर महाराष्ट्र यांच्यावतीने कॅडेट साठी पेपर बॅग वापरण्यासंदर्भात जनजागृती व्हावी म्हणून पोस्टर कॉम्पिटिशन व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए व्ही पाटील यांनी पोस्टर कॉम्पिटिशन चे उद्घाटन करून कॅडेट्स यांनी तयार केलेल्या विविध पोस्टरचे निरीक्षण करून व कॅडेट्नी दिलेल्या प्रेझेंटेशन चा आनंद घेतला. यासाठी एनसीसी विभागातील तृतीय वर्ष छात्र व द्वितीय वर्ष छात्र यांना एकत्रित करून सहा समूहांमध्ये छात्रांना विभाजित करून छात्रांमध्ये नेतृत्व गुण, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक वापराचे पर्यावरणीय परिणाम व स्पर्धात्मक दृष्टिकोन याबद्दल विकास व्हावा म्हणून त्यांना 6 ग्रुप मध्ये विभाजीत करण्यात आले .स्पर्धा निरीक्षक म्हणून प्रा. देविदास सोनवणे यांनी काम केले. उपक्रमाचे नियोजन व संयोजन एनसीसी विभागाचे प्रमुख कॅप्टन पी आर बर्डे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए व्ही पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, कुलसचिव समाधान केदारे, प्रा. अनिल आहेर,प्रा. विजया सोनवणे, प्रा.अमोल बरकाले व कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये बालकाच्या शिल्पाचे अनावरण
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारा समोर अभ्यास...












