नांदगाव : कॉ. माधवराव गायकवाड यांचे व्यक्तिमत्व उतुंग होते, त्यांची वैचारिक एकनिष्ठता दीपस्तंभासारखी आहे. त्याचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे विचार नांदगावचे माजी नगराध्यक्ष भास्कर कदम यांनी त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
नांदगाव येथील छत्रपती पत संस्थेत कॉ. माधवराव गायकवाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाखा व्यवस्थापक देविदास नंद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी बाबूजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भास्कर कदम यांनी भाषणात नमूद केले की, आज वैचारिक एकनिष्ठता दुर्मीळ होत चालली आहे. कॉ. गायकवाड हे अखेरच्या श्वासापर्यंत कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. अनेकदा पराभव पत्करले; परंतु विचारधारेशी बेईमानी केली नाही. तळागाळातील माणसासाठी त्यांचा संघर्ष होता. आयुष्यभर त्यासाठीच लढा दिला. कॉ. बाबूजींचा प्रत्यक्ष सहवास लाभला हे आमचे भाग्य समजतो, असेही कदम यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी सांगितले.
आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन राहूल अहिरे यांनी केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नेमीचंद अग्रवाल, सलीमभाई शेख, धनराज अग्रवाल, अरबाज शेख, नाना पगार, दीपाली रत्नपारखी, शालिनी पगारे, भरत कासलीवाल, अशोक जाधव, रवींद्र पवार, मजहर खान, फकीर मोहंमद मन्सूरी, गिरीश कलंत्री यांचेसह सभासद उपस्थित होते.

साईराज राजेश परदेशी ने पटकावले सुवर्णपदक
अहमदाबाद येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप या अंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज...