मनमाड:- येथील व्ही. एन. नाईक हायस्कूल मध्ये शालेय पोषण आहार
अंतर्गत किचन शेड मंजूर झाले असून जागेचे भूमिपूजन मनमाठ गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजितसिंग यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी लोक शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी आमदार जगन्नाथ धात्रक, रोटरी क्लब चे गुरुदिप सिंग कांत,.. माने साहेब, शाळेचे मुख्याध्यापक सुनिल नाईक, शालेय समिती चे संतोष सांगळे, जेष्ठ शिक्षक हेमत कातकडे. दिपक गायकवाड, संजय पवार, निबा पवार, गिरीष दारून्टे, दिनेश शिरसाठ, नंदू सांगळे, तसेच रोटरी क्लब सदस्य उपस्थित होते.
या प्रसंगी बाबा रणजित सिंग यांनी शाळेसाठी 113 गोणी सिंमेट, तसेच वर्गासाठी 15 फॅन शाळेसाठी दिले.
संस्थेचे चेअरमन. जगन्नाथ धात्रक, शाळेचे मुख्याध्यापक सुनिल नाईक यांनी बाबाचे आभार मानले. यापूर्वी श्री. गुरुगोविंदसिग पब्लिक वेलफेयर ट्रस्टच्या माध्यमातून शालेय साहित्य बेंच 53, टेबल 2 मिळाले.यासाठी रोटरी क्लबचे श्री गुरुदीपसिंग कांत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.