बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने सन 2025 मध्ये झालेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत के. आर. टी विद्यालयाची कु. समृद्धी वसंत विंचू➖प्रथम तर कथाकथन स्पर्धेत छत्रे न्यू इंग्लिश विद्यालयाची कु. चिन्मयी विनोद पवार ➖प्रथम व निबंध स्पर्धेत, मोठया गटात छत्रे न्यू इंग्लिश विद्यालयाचा कु ओम संदीप पवार ➖प्रथम तर लहान गटात प्रकृती स्कूलची कु.आभा अमोल गुजराथी ➖ प्रथम➖ पारितोषिक विजेते ठरले
मनमाड – मनमाड शहाराचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन वाचन चळवळीत 111 वर्षाची शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने लोकशाहीर स्व.अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त गेल्या 57 वर्षा पेक्षा जास्त काळा पासून मनमाड शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना विविध विषयात लेखन, करण्याची गोडी लागावी म्हणून मनमाड शहरात या आंतरशालेय निबंध /कथाकथन/ व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. नाशिक जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात वाचनालय तर्फे अशा प्रकारची एकमेव स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाही हिच परंपरा कायम टिकवत यंदाही वाचनालयातर्फे गुरुवार दि.31 जुलै 2025 रोजी आंतर शालेय कथाकथन तर शुक्रवार दिनांक 01ऑगस्ट 2025 रोजी आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा लोकमान्य सभागृह इंडियन हायस्कूल येथे संपन्न झाल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या व्यासपीठवर प्रमुख अतिथी म्हणून मनमाड विभागाचे पोलीस उप विभागीय अधिकारी बाजीराव महाजन (डी. वाय. एस. पी.)साहेब तसेच शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा जेष्ठ संचालक नरेश गुजराथी, उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट, वाचनालय चे माजी अध्यक्ष सुरेश शिंदे, प्रदीप गुजराथी कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षक सर्व सन्माननीय कवी जनार्दन देवरे सर, सायली हेमंत पेंडसे, प्रा डॉ प्रांजली प्रमोद ढेरे तसेच निबंध स्पर्धा परीक्षक रमाकांत यशवंत मंत्री,अक्षय सानप आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती, स्व.लोकमान्य टिळक, स्व.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत द्विप प्रज्वलन करून या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.सर्व मान्यवर व परीक्षकांचा ग्रंथभेट देऊन स्वागत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे यांनी सोशल मीडियाच्या अत्यंत कठीण काळातही शालेय विद्यार्थ्यांना वक्तृत्व व लेखनाचे,वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सर्वांच्या सहकार्याने वाचनालय नियमित पणे दरवर्षी या स्पर्धेचा उपक्रम करीत आहोत असे सांगितले. मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या विविध आगामी उपक्रमाची माहिती देत सचिव कल्पेश बेदमुथा यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यांनी केले तर परिक्षकांतर्फे कवी जनार्दन देवरे सर, सायली पेंडसे, प्रा.प्रांजली ढेरे यांनी मार्गदर्शनपर मनोगता मध्ये विध्यार्थी /पालक /शिक्षक यांना महत्वपूर्ण सूचना केल्या तर मनमाड सार्वजनिक वाचनालय हे सामाजिक बांधिलकी जपत अशा आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करुन शालेय विद्यार्थ्यांन साठी वाचन लेखन आणि वक्तृत्व चे व्यासपीठ उपलब्ध करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणारा उपक्रम गेल्या सहा दशकांपासून करीत आहे हे कौतुकास्पद आहे यातूनच पुढे देशाचे जबाबदार नागरिक घडतील या स्पर्धा एक कार्यशाळा च आहे असे आपल्या प्रमुख अतिथीय मनोगत मध्ये प्रमुख अतिथी डी. वाय. एस. पी. बाजीराव महाजन यांनी केले महाजन यांच्या हस्ते खालील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व पुस्तक स्वरुपात बक्षिस वितरण करण्यात आले. मनमाड सार्वजनिक वाचनालय – आंतर शालेय निबंध स्पर्धा ➖मोठा गट (इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 वी ➖अंतिम निकाल ➖1) प्रथम पारितोषिक ➖कु. ओम संदीप पवार (छत्रे न्यू इंग्लिश विद्यालय ) 2)द्वितीय पारितोषिक ➖कु. जान्हवी सुनील महाले (सरस्वती विद्यालय ) 3) तृतीय पारितोषिक ➖कु समर उपाली परदेशी (के. आर. टी. विद्यालय ) 4)प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. तनुश्री चंद्रकांत नाईक (. के. आर. टी. विद्यालय ) 5)द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. मयुरी महामोगलायन गाढे (छत्रे न्यू इंग्लिश विद्यालय ) 6)तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. एंजल ऍंथोनी लालझरे (संत बार्णाबा हायस्कूल ) 7)चतुर्थ उत्तेजनार्थ पारितोषिक- कु. श्रेया सागर कोल्हे( गुरू गोविंद सिंग हायस्कूल) 8)पाचवे उत्तेजनार्थ पारितोषिक कु. सिद्धी अशोक आहिरे (मरेमा विद्यालय) आंतर शालेय निबंध स्पर्धा लहान गट (इयत्ता 05 ते इयत्ता 08 वी ) अंतिम निकाल 1)प्रथम पारितोषिक ➖कु. आभा अमोल गुजराथी (प्रकृती स्कूल )2)द्वितीय पारितोषिक ➖कु. वेदांत गणेश आहेर (छत्रे न्यू इंग्लिश विद्यालय ) 3) तृतीय पारितोषिक ➖कु. आरोही बाळासाहेब घोडके (मरेमा विद्यालय ) 4) प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु.नितीक्षा अनिल म्हसदे (के आर टी विद्यालय ) 5)द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. पूर्वी विशाल राजोळे (सरस्वती विद्यालय) 6)तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. अनुष्का अतुल झाल्टे (संत झेवीयर हायस्कूल)7) चतुर्थ उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. अस्मि बाविस्कर (प्रकृती स्कूल ) 8)पाचवे उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. नेहा विनोद चावरिया (मरेमा विद्यालय )आंतर शालेय कथाकथन स्पर्धाअंतिम निकाल 1)प्रथम पारितोषिक ➖कु. चिन्मयी विनोद पवार (छत्रे न्यू इंग्लिश विद्यालय ) 2)द्वितीय पारितोषिक ➖कु. आभा अमोल गुजराथी (प्रकृती स्कूल ) 3) तृतीय पारितोषिक ➖कु. सक्षम मनिलाल जगताप (छत्रे न्यू इंग्लिश विद्यालय ) 4)प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. सिद्धी दगडू ढिवरे (मरेमा विद्यालय ) 5) द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. वेदांत शुभम मेहत्रे (के. आर. टी. विद्यालय ) 6) तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. आराध्या निलेश धात्रक (संत झेवीयर हायस्कूल ) 7)चतुर्थ उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. वैष्णवी योगेश दराडे(छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ) 8) पाचवे उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. जान्हवी अमोल शिंदे (सरस्वती विद्यालय )आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा अंतिम निकाल 1) प्रथम पारितोषिक ➖कु.समृद्धी संजय विंचू( के. आर. टी विद्यालय) 2)द्वितीय पारितोषिक ➖कु. सिद्धेश मंगेश वाणी (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल )3) तृतीय पारितोषिक ➖कु रिद्धी अशोक आहिरे (मरेमा विद्यालय ) 4)प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. रुद्राणी विनोद देशमानकर ( के. आर टी. विद्यालय) 5) द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक ➖ कु. गार्गी राजेंद्र व्यवहारे( छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ) 6) तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. श्रद्धा सचिन पवार (. संत बार्णबा विद्यालय )7) चतुर्थ उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. श्रावणी ईश्वर खैरनार(के. आर. टी. विद्यालय)8) पाचवे उत्तेजनार्थ पारितोषिक ➖ कु. जान्हवी सुनील महाले (सरस्वती हायस्कूल )तर या सर्व स्पर्धा मध्ये सहभागी झालेल्या 1000 पेक्षा जास्त विध्यार्थ्यांना वाचनालय तर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, आंतरशालेय निबंध स्पर्धेत या निबंध मनमाड शहरातील सुमारे 16 माध्यमिक विद्यालयातील स्पर्धेत 905 तर कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुमारे 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अक्षय सानप ,ऍड संजय गांधी अभिषेक पितृभक्त ,राहुल लांबोळे,,विक्रम सप्रे,हर्षद गद्रे सर,चेतन सुतार दिनेश धारवाडकर ,संदीप देशपांडे, मुकेश मिसर, हेमंत वाले सर सदाशिव सुतार , मंगेश वाणी सर,सौ योगिता देशपांडे, प्रकाश धामणस्कर रवींद्र पाटील अशोक व्यवहारे यांचे विशेष सहकार्य या स्पर्धा उपक्रम कार्यक्रमास , मनमाड पत्रकार संघाचे अध्यक्ष आझाद आव्हाड , सतीश शेकदार,विनोद देशमानकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा पर भेट दिली या कार्यक्रमला मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ.संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ.नंदिनी फुलभाटी, मच्छिन्द्र साळी आदी मान्यवरांन सह मोठ्या संख्येने पालक, शिक्षक व विद्यार्थीवर्ग, वाचक उपस्थित होता. कार्यक्रम चे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालया चे अध्यक्ष नितीन पांडे,सचिव कल्पेश बेदमुथा आणि संचालक मंडळ ने केले.