loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये ‘ मातृ पितृ दिन ‘ मोठ्या उत्साहात संपन्न

Aug 3, 2025

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये ‘ मातृ पितृ दिन ‘ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळेतील कु.समीक्षा राजू लहिरे या विद्यार्थिनीचे आई- वडिल श्री. राजू हरी लहिरे (शिक्षक,कवी पत्रकार )व सौ. वैशाली राजू लहरे यांना या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मान देण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो,शाळेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना त्याचप्रमाणे शाळेचे पर्यवेक्षक श्री अनिल निकाळे सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री राजू हरी लहरे यांनी आपल्या भाषणातून आई-वडिलांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले व आई-वडिलांची महती सांगणा-या कविता देखील सादर केल्यात. आपल्या अध्यक्षीय भाषणातून फादर माल्कम नातो यांनी मुलांच्या जीवनात आई-वडिलांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे विषद केले. कुमार साई संतोष पवार याने आपल्या भाषणातून माता-पिता संस्कृतीचं महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन सिद्धार्थ दत्तात्रय माळी याने केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय अशोक गायकवाड सर यांनी करून दिला. शालेय गायन ग्रुपने आई-वडिलांच्या महतीचे गीत सादर करून वातावरण भाव विभोर केले. आभार प्रदर्शन कुमारी चंचल रंगनाथ ढोमसे हिने केले. कुमारी आराध्या निलेश धात्रक व कुमार प्रेरित संदेश खरात या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी – डॉ.भारती पवार

राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी – डॉ.भारती पवार

चांदवड - हिंदुस्थानचे युगपुरुष श्रीमंत सुभेदार 'मल्हारराव होळकर' जन्मोत्सव सोहळा श्रीमंत महाराजा...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी.  मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य,महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षिका कर्मचारी  उपस्थित होते.उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यांची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी....

read more
मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड - भाजपा मनमाड शहर मंडला च्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या...

read more
.