loader image

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

Aug 17, 2025


मनमाड — नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये छत्रे विद्यालयाने द्वितीय व कवी रवींद्रनाथ टागोर स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला.स्पर्धेत गुरू गोविंदसिंग इंग्लिश मिडीयम स्कूल, सरस्वती विद्यालयाच्या संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

छत्रे विद्यालयाच्या सीतालक्ष्मी हॉलमध्ये पार पडली. शहरातील विविध शाळांचे विद्यार्थ्यांचे संघ तबला, हार्मोनियम, ड्रम यांसारख्या वाद्यांसह सज्ज होऊन आले होते. प्रत्येक सादरीकरणामध्ये देशप्रेमाची भावना ओसंडून वाहत होती.

स्पर्धेची सुरुवात ‘आमचा देश महान’ या प्रेरणादायी गीताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘तेरी मिट्टी मे मिल जावां’, ‘सबसे ऊंची विजयी पताका’, ‘वंदे मातरम’, ‘आओ हम सब गाएं इस देश के तराणे’ यांसारखी फिल्मी व नॉन-फिल्मी देशभक्तिपर गीते सादर केली. संपूर्ण सभागृह या देशभक्तीमय वातावरणात भारावून गेले.

काही विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच मंचावर गायनाची संधी घेतली. त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि आनंद पाहता त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच. स्पर्धेनंतर ‘भारत माता की जय’ आणि ‘स्वातंत्र्य दिन चिरायू होवो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या स्पर्धेचे परीक्षण मालेगाव येथील संगीत विशारद शंकर महाजन आणि चांदवड येथील संगीत विशारद जयश्री वणवे यांनी केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि सादरीकरणाचे मनःपूर्वक कौतुक केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन संविधान पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक विजय करे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल खरे होते. मंचावर ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी, जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, जेष्ठ पत्रकार सतीश शेकदार, कविवर्य संदीप देशपांडे, जेष्ठ पत्रकार नरहरी उंबरे, तालुका उपाध्यक्ष सोमनाथ घोंगाणे, अनिल निरभवणे, कविवर्य जनार्दन देवरे, जेष्ठ पत्रकार रामदास सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

विजयी संघांना आकर्षक ट्रॉफी व रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कार्याध्यक्ष उपाली परदेशी यांनी केले. सरचिटणीस निलेश वाघ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर संघटक अशोक बिदरी यांनी आभार मानले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सहकोषाध्यक्ष रुपाली केदारे, प्रिया परदेशी, दीपाली खरे, आम्रपाली वाघ, प्रमिला उंबरे, नैवेद्या बिदरी, माधुरी कदम, गणेश केदारे, योगेश म्हस्के, आनंद बोथरा, राजू लहिरे, आशिष मोरे, विनायक कदम, प्रणव हरकल आदींनी केले.

प्रसिद्ध वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, गुड शेफर्ड स्कूलचे प्राचार्य क्लेमेंड नायडू, छत्रे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता पोतदार, संत बार्नबा विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. यु. कराड, संजीवनी निकुंभ, स्मिता कुदाळ, समीर गुंजाळ तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयी संघांची यादी :

प्रथम क्रमांक : गुड शेफर्ड स्कूल

द्वितीय क्रमांक : छत्रे विद्यालय

तृतीय क्रमांक : कवी रवींद्रनाथ टागोर स्कूल

उत्तेजनार्थ : संत झेवीयर्स हायस्कूल, संत बार्नबा विद्यालय, सरस्वती विद्यालय, गुरू गोविंदसिंग इंग्लिश मिडीयम स्कूल

फोटो
मनमाड : प्रथम क्रमांक पटकावलेल्या गुड शेफर्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करताना मान्यवर.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.