loader image

मनमाड महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Aug 17, 2025


मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण व्हि.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. ध्वजारोहण व राष्ट्रगीता नंतर महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या भाषणात देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तंत्रज्ञान, शिक्षण, कृषी व आरोग्य क्षेत्रातील उपलब्धींचा उल्लेख करताना त्यांनी “विकसित भारत २०४७” या संकल्पनेवर भर दिला. युवकांनी नव्या संधींचा लाभ घेऊन राष्ट्रनिर्माणात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सेवन विरोधी शपथ दिली.
याप्रसंगी मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री विजय कर्हे, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्या श्रीमती अलकाताई शिंदे, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री सुभाष अहिरे, व्यवसायिक अभ्यासक्रम विभागाचे उपप्राचार्य श्री पी के बच्छाव, कुलसचिव श्री समाधान केदारे, वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक, शैक्षणिक पर्यवेक्षक, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
लेफ्टनंट बर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय छात्र सेना विभागाने केले.


अजून बातम्या वाचा..

.