महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय,मनमाड येथे रक्तदान अमृत महोत्सव 2.0 या मोहिमेअंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.अरुण विठ्ठल पाटील तसेच उपजिल्हा रुग्णालय मनमाड चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व रेड रिबन क्लब यांच्या वतीने करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उदिष्ट थेलेस्मिया किंवा रक्ताचे दुर्गम आजार असणाऱ्या व्यक्तींना सुलभ रक्त उपलब्ध व्हावे हे होते. यासाठी जिल्हा रुग्णालय नाशिक येथील मेट्रो शासकीय रक्तपेढी चे डॉ. पियुष बोरसे, डॉ. योगेश लवाटे, मंगेश राठोड, स्वप्निल सहारे, अभिजीत कापसे, किशोर जाधव, प्रतिभा ठाकरे, मंगेश कुवर, निकिता, राजकुमार मोरे,अनिल जोशी, किशोर राठोड,समुपदेशक निलेश मोरे, राहुल भगत यांच्या टीमने रक्तदानासाठी काम केले. या रक्तदान शिबिरात 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.अरुण विठ्ठल पाटील यांच्या हस्ते, प्रभारी उप प्राचार्य प्रा. डी. व्ही.सोनवणे, ग्रंथपाल प्रा डॉ राहुल लोखंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या रक्तदानाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी, राष्ट्रीय छात्रसेना प्रमुख प्रा. प्रकाश बर्डे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा सोमनाथ पावडे, प्रा विजया सोनवणे, एन.एस.एस. स्वयंसेवक व स्वयंसेवीका ,एनसीसी कॅडेट यांचे मोलाचे सहकार्य लाभले.














