मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील अर्थशास्त्र विभागाचा विद्यार्थी श्री गणेश झाल्टे यांनी रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या (RRB) परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाने त्यांचा सत्कार केला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण विठ्ठल पाटील यांनी श्रीगणेश झाल्टे यांचे कौतुक करत त्यांना सन्मानपत्र देऊन अभिनंदन केले. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या कष्टाचे आणि चिकाटीचे कौतुक करत, त्यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला.
सत्कार कार्यक्रमात अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गजानन शेंडगे, तसेच डॉ. सुनील घुगे आणि डॉ. राजाराम जाधव उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी गणेश झाल्टे यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या आणि इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरणार असल्याचे सांगितले.
गणेश झाल्टे यांनी त्यांच्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत महाविद्यालय आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाले असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, कठोर परिश्रम, नियोजन, आणि सातत्य हे यशाचे मुख्य घटक आहेत.
महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ही उपलब्धी विद्यार्थ्यांच्या मनोबलवाढीसाठी आणि इतर विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी महत्त्वाची असल्याचे मानले.
अशा प्रकारे महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महाविद्यालयाचे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहे, हे दाखवून देत आहेत.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...