loader image

*मनमाड महाविद्यालयात वंदे मातरम गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन* 

Nov 8, 2025


 

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व. बकिमचंद्र चटोपाध्याय रचित वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला दीडशे वर्षपूर्ण होत आहेत. या वर्षपूर्तीचे औचित्य साधून मनमाड महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण वंदे मातरम गीताचे गायन करण्यात आले. याप्रसंगी आपल्या मनोगतातून प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा इतिहास व महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.

तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर भाषणे सादर केलीत. मराठी विभागाचे प्रा विठ्ठल सातपुते यांनी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री सुभाष अहिरे, किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य श्री पी. के बच्छाव, पर्यवेक्षक विठ्ठल फंड, वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा देविदास सोनवणे, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजन हिंदी विभागाचे प्रा देवेंद्र पवार यांनी केले तर आभार पी. व्ही. अहिरे यांनी मानले.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.