loader image

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये बालकाच्या शिल्पाचे अनावरण

Nov 15, 2025


मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारा समोर अभ्यास करणाऱ्या बालकाच्या शिल्पाचे अनावरण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले

माजी नगराध्यक्ष श्री.राजाभाऊ आहिरे ( माजी विद्यार्थी) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम ,माननीय उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना ,माननीय पर्यवेक्षक श्री अनिल निकाळे सर, प्राथमिक शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ. अर्चना निकाळे मॅडम ,सेंट विन्सेंट हाऊसच्या सुपेरिअर सिस्टर रोज मनमाड धर्मग्रामाचे प्रमुख फादर सहाय्य राज आदी मान्यवर उपस्थित होते

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. लीना दत्तू जाधव मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक श्री हेमंत वाले सर यांनी केले. आभार प्रदर्शन सौ रोहिणी जाधव मॅडम यांनी केले. यावेळी प्राथमिक शाळेच्या बालकलाकारांनी नृत्य तर माध्यमिक शाळेच्या बालकलाकारांनी लेझीम प्रात्यक्षिके सादर केलीत. शाळेच्या गायनग्रुपने बालगीत सादर करून वातावरण भारून टाकले. शाळेच्या माननीय मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणातून शिल्प बसवण्याचा उद्देश व बाल दिनाचे महत्त्व विशद केले.


अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
.