loader image
[ays_poll id=7]

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

Dec 10, 2025

*

BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन 19 वर्षाआतील संघाची निवड चाचणी नोव्हेंबर 2025 मध्ये पार पाडण्यात आली.
या निवड प्रक्रियेत मनमाड मधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा संघाच्या संभाव्य खेळाडुंच्या यादित निवड झाली होती. त्यानंतर हे निवड झालेले खेळाडु शिर्डी येथे निवड चाचणी खेळण्यास पात्र झाले. 04 निवड चाचणी सामण्यात आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करुन या खेळाडुंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर नंदुरबार अंडर 19 जिल्हा संघात निवड निश्चित केली व नंदुरबार जिल्हा क्रिकेट संघाचे सदस्य झाले.

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत हे सामने डिसेंबर महिन्यात छ. संभाजीनगर व संपुर्ण महाराष्ट्रभर खेळवले जाणार असुन हे सर्व खेळाडु जिल्हास्तरीय सामने खेळतील. मनमाडचे हे खेळाडु महाराष्ट्र संघात निवड होण्यासाठी आपल्या खेळाचे प्रदर्शन उच्चस्तरीय स्पर्धेत करणार आहेत. याआधी खुशाल परळकर हा 14 व 16 वर्षाआतील महाराष्ट्र संघाच्या संभावित खेळाडुंच्या यादित सलग दोन वेळा जागा बनवण्यात सक्षम ठरला होता.
यापुढे या खेळाडुंकडुन चांगली कामगीरि होऊन त्यांची 19 वर्षातील महाराष्ट्र राज्य संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा सर्वाकडुन या खेळाडुंना दिली जात आहे. मनमाड शहराचे नंदुरबार जिल्ह्यासंघात प्रतिनिधित्व करण्यासाठी हे खेळाडु भुमी क्रिकेट अकॅडमी श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल ग्राऊंड मनमाड येथे सराव करत आहे.

नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे सचिव श्री. युवराज पाटिल सर व मनमाड गुरुद्वारा येथील जथेदार बाबा रणजित सिंग जी यांचे विशेष सहकार्य या खेळाडुंना लाभले तसेच श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे ही विशेष सहकार्य लाभले.

या निवडीसाठी नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास आण्णा कांदेजी व भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, सिध्दार्थ बरडिया , जावीद सर , सुरज अरोरा , मनोज ठोंबरे , सनी फसाटे तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुंचे प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे मार्गदर्शन या सर्वांना लाभले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.