loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा

Dec 18, 2025


*मनमाड: दिनांक १८डिसेंबर*
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ बी. एस. देसले होते. प्रमुख वक्ते राज्यशास्त्र विभागाचे प्रा. शरद वाघ यांनी आपल्या मनोगतातून समाजातील अल्पसंख्यांक समुदायांचे हक्क जपणे, त्यांच्यात समानता निर्माण करणे आणि त्यांच्यावरील अन्याय दूर करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समानतेचा, धर्मस्वातंत्र्याचा आणि शिक्षणाचा हक्क दिला आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अल्पसंख्यांक हक्क दिन आपल्याला शिकवतो की कोणालाही धर्म, भाषा किंवा संस्कृतीच्या आधारावर कमी लेखू नये. सर्वांनी एकमेकांचा आदर केला तरच देशाची खरी प्रगती होईल. असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री सुभाष अहिरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ देविदास सोनवणे, पर्यवेक्षक श्री विठ्ठल फंड, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी. व्ही. अहिरे यांनी तर आभार श्री विठ्ठल सातपुते यांनी व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.