Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Dec 26, 2025

मनमाड : (प्रतिनिधी)

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा जनश्रद्धा कार्यालयात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार नरेश गुजराथी होते.

सभेस संघाचे संस्थापक अमोल खरे, तालुकाध्यक्ष संदीप जेजुरकर, सरचिटणीस निलेश वाघ, ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी, नरहरी उंबरे, मारुती जगधने, जहूर खान, सतीश शेकदार यांच्यासह अनेक पत्रकार सदस्य उपस्थित होते.9

सभेच्या प्रारंभी कार्याध्यक्ष उपाली परदेशी यांनी मागील सभेचे इतिवृत्त व जमाखर्च सभेपुढे सादर केला. यावर उपस्थित सदस्यांनी चर्चा करून सदर इतिवृत्त व जमाखर्च अहवालास सर्वानुमते मंजुरी दिली.

त्यानंतर संघामार्फत मागील वर्षात राबविण्यात आलेले विविध उपक्रम, बैठका व आंदोलने यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सभेत आयत्यावेळी आलेल्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.

संघाच्या सदस्यांच्या दिवंगत नातेवाईकांना सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच मनमाड व नांदगाव नगरपरिषदेत नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक, संघाच्या सदस्यांना मिळालेल्या नियुक्त्या, पुरस्कार तसेच त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल अभिनंदनाचे ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी काही सदस्यांचा सत्कारही करण्यात आला.

संघाच्या कार्यपद्धतीबाबत सदस्यांनी समाधान व्यक्त करत भविष्यातील उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचना मांडल्या. सर्व पत्रकार सदस्यांनी मनोगत व्यक्त करून संघाच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी उपयुक्त सूचना दिल्या.

येत्या ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त नांदगाव येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच संघाचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नांदगाव–मनमाड समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सभेचे अध्यक्ष नरेश गुजराथी यांनी अध्यक्षीय भाषणात पत्रकार संघाची एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारांच्या प्रश्नांवर संघाने कायम ठाम भूमिका घ्यावी, असे मार्गदर्शन केले.

सभेचे सूत्रसंचालन उपाली परदेशी यांनी केले तर अशोक बिदरी यांनी आभार मानले. यावेळी अनिल निरभवणे, प्रमित आहेर, तुषार गोयल, बाबासाहेब बोरसे, गणेश केदारे, रुपाली केदारे, राजू लहिरे, बापू मार्कंड, मिलिंद वाघ, योगेश म्हस्के, आनंद बोथरा, रामदास सोनवणे, राजेंद्र धिंगाण, प्रणव हरकल, पंकज जाधव, विनायक कदम आदी पत्रकार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]