loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची ‘सुवर्ण’ भरारी!

Jan 8, 2026


छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या ६९ व्या नॅशनल स्कूल गेम्स मध्ये मनमाड येथील जय भवानी व्यायामशाळा व छत्रे विद्यालयाची खेळाडू श्रावणी विजय पुरंदरे हिने महाराष्ट्र राज्य शालेय वेटलिफ्टिंग संघाचे प्रतिनिधित्व करत ५३ किलो वजनी गटात ६७ किलो स्न्याच ७८ किलो क्लीन जर्क १४५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले.

तसेच जय भवानी व्यायामशाळा व वागदर्डी विद्यालयाच्या साहिल यादवराव जाधव याने ७९ किलो वजनी गटात ११९ किलो स्न्याच १५० किलो क्लीन जर्क २६९ किलो वजन उचलत चुरशीच्या लढतीत सुवर्णपदक पटकावले

भारतातील २६ राज्यातील ३८४ खेळाडू मुलींच्या व मुलांच्या आठ वजनी गटात सहभागी झाले असून प्रत्येक वजनी गटात चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राचे खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत.

यशस्वी खेळाडूंना वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे,  आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

या नेत्रदिपक कामगिरीबद्दल जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ.विजय पाटील, मोहन गायकवाड, डॉ.सुनील बागरेचा, प्रा.दत्ता शिंपी, नगराध्यक्ष योगेश पाटील, छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी.जे.दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, बी.एस.कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापिका एस.एस.पोतदार, उपमुख्याध्यापक संचालक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका व्ही.व्ही.चांदवडकर, वागदर्डी विद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश जैन, मुख्याध्यापक संतोष भराडे, महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे संतोष सिंहासने, अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
.