loader image
[ays_poll id=7]

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

Jan 10, 2026

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता पक्षात मात्र नांदगाव तालुक्यात वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. निवडणुकीदरम्यान जिल्हा पदाधिकारी विश्वासात न घेत असल्याच्या कारणावरून मनमाड शहराच्या 50 पेक्षा जास्त भाजपा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्याकडे राजीनामे दिले होते.

आता मनमाड पाठोपाठ नांदगाव मध्ये देखील भाजपमध्ये अंतर्गत नाराजीनाट्य सुरू असल्याचे चित्र आहे. नांदगाव भाजपा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांची भेट घेत संजय सानप व दत्तराज छाजेड या दोघांना पदमुक्त करण्याची विनंती केली आहे, त्यांनी दिलेल्या निवेदनात शहराध्यक्ष संजय सानप व व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी नांदगाव नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची ताकद असताना देखील केवळ दोन जागा घेत शिवसेनेसोबत युती जाहीर केली होती, या निर्णयात स्थानिक कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यात आलेले नव्हते व कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आलेली नव्हती.

भारतीय जनता पक्षाची थेट नगराध्यक्ष सह नगरसेवक पदाच्या उमेदवारांची संख्या असताना देखील या प्रकारे युती जाहीर केल्यामुळे पक्षाची प्रतिमा ढासळली असून या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांना पदमुक्त करण्यात यावे अशी विनंती देखील सदर निवेदनात करण्यात आलेली आहे. भाजप नांदगाव शहराध्यक्ष संजय सानप व व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी स्थानिक कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नगरपालिका निवडणुकीत शिवसेने सोबत मात्र दोन जागा घेत आघाडी जाहीर केली होती त्यातही दत्तराज छाजेड यांनी ऐनवेळी माघार घेतल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

सदर निवेदनावर दिगंबर कवडे, प्रदीप थोरात, डॉ. राजेंद्र आहेर, सतीश अहिरे, नारायण मोरे, सतीश शिंदे, राजेंद्र गांगुर्डे, अड.उमेश सरोदे , गणेश रिंढे, बळवंत शिंदे, सौ.तारा शर्मा, गणेश शर्मा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.