loader image
[ays_poll id=7]

SNJB ला महिंद्रा अँड महिंद्रा तर्फे बोलेरो न्युओ ऍम्बुलन्स भेट

Jan 10, 2026

श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम (जैन गुरुकुल) SNJB चांदवड या संस्थेच्या आयुर्वेद ऍन्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल साठी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्सीयल सर्व्हिसेस लि.मुंबई मार्फत बोलेरो न्युओ ऍम्बुलन्स कार्पोरेट सोशियल रिस्पॉन्सिबिलीटी स्कीम (CSR) अंतर्गत डोनेट करण्यात आली.

मागील 98 वर्षात ज्ञानदानाचे काम करता-करता सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेने जे योगदान दिले आहे त्यात चांदवड व पंचक्रोशीतील गोरगरीबांना वैद्यकीय सहयोगाचा सिंहाचा वाटा राहीला आहे. कोवीड साथीच्या कालावधीत संस्थेने “डॉक्टर आपल्या दारी” हा उपक्रम राबवत दोन डॉक्टर्स, दोन ऍम्बुलन्स व दोन मदतनीसची टीम पुरवून खेडोपाडी व घरोघरी जाऊन सेवा दिली. कोरोना संसर्गापासून बचाव करणारे ARS-ALB-30 हे होमिओपॅथिक औषध मोफत वाटप, क्वारंटाईन व्यक्तींसाठी वसतिगृह तसेच कोवीड हाय आणि मिड रिस्क रुग्णांच्या उपचारासाठी हॉस्पिटल अशा विविध सेवा दिल्या आहेत.

वरीलप्रमाणे मागील 98 वर्षातील शैक्षणिक क्षेत्रातील संस्थेचे योगदान तसेच संस्थेच्या वैद्यकीय क्षेत्रातील दिर्घकालीन योगदानाची व सामाजिक बांधिलकी म्हणून दिलेल्या सामाजिक सहयोगाची दखल घेत या कामाची प्रशंसा म्हणून कार्पोरेट सोशियल रिस्पॉन्सिबिलीटी स्कीम (CSR) अंतर्गत महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्सीयल सर्व्हिसेस मार्फत ही ऍम्बुलन्स डोनेट करण्यात आली आहे.

याकामी संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती यांनी विशेष मेहनत घेऊन सातत्यपूर्ण पाठपुरावा केला तसेच विश्वस्त व प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

ऍम्बुलन्स अर्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, सचिव झुंबर भंडारी, सदस्य कांतीलाल बाफना, नंदकिशोर ब्रम्हेचा, सुनील चोपडा,सुमती सुराणा, प्रबंध समिती सदस्य कमलेश ओस्तवाल, योगेश मोदी, रोशन टाटीया, अभिजित मोदी, डॉ.आकाश जैन, पंकज चोपडा तसेच प्रशासकीय अधिकारी पी.पी.गाळणकर, डॉ.गोटन जैन, आयुर्वेद व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मेडिकल डायरेक्टर व प्रिंसिपल डॉ.दिपाली चंडालिया आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

      मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस...

read more
नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती  वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

संपूर्ण जगात सतत युद्ध जन्य परिस्थिती चे संकट असताना भारताचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी  निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.