loader image
[ays_poll id=7]

जिल्हा परिषदेच्या निवडणुका अजून लांबणीवर पडण्याची शक्यता ?

Jan 11, 2026


काही वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यासाठी निवडणूक आयोगाने सुरुवात केलेली असताना व राज्यातील नगरपालिका व नगरपंचायती यांच्या निवडणुका संपन्न होऊन येत्या 15 जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न होत आहेत परंतु राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर अजूनही टांगती तलवार कायम आहे.

50 टक्के पेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका निवडणूक आयोग जाहीर करणार असतानाच आता सर्व जिल्हा परिषद निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे सदर याचिकेवर सोमवार दि.12 जानेवारी रोजी सुनावणी पार पडणार आहे, यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाचा काय आदेश येतो, यावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे.

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 31 जानेवारी पूर्वी घेण्याचे आदेश दिले होते परंतु बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये आरक्षण 50 टक्के पेक्षा जास्त झालेले असल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण याचिकेच्या निकालास अधीन राहून निवडणूक घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते परंतु आता नगरपालिका नगरपंचायत या निवडणुका झालेल्या असून काही दिवसातच महानगरपालिकेसाठी देखील मतदान होणार आहे यातच आता सोमवारी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबतच्या सुनावणीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होतील हे ठरणार आहे.


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
.