Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात जिल्हास्तरीय पर्यावरण संवर्धन कार्यशाळा संपन्न

Jan 19, 2026

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड व राष्ट्रीय सेवा योजना विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जिल्हास्तरीय पर्यावरण संवर्धन कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील, उप प्राचार्य डॉ. बी.एस देसले यांच्या मार्गदर्शनात मनमाड महाविद्यालयात संपन्न झाली.

कार्यशाळेचे उदघाटन प्रतिभा कोठुळे, सुशांत रणशूर, अतुल देवरे, पूजा पगार, पुनम धांद्रे, कुलसचिव समाधान केदारे, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. डी.व्ही. सोनवणे, डॉ. संजय चिंचोले, प्रा.समाधान सुखदेवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रतिभा कोठुळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आज होणारा निसर्गाचा ऱ्हास व त्यावरच्या उपायोजना, राह फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध जैवविविधता उपक्रमांविषयी माहिती तसेच राह फाउंडेशनतर्फे निमोण येथे सुरू असलेल्या वृक्षारोपण, जैवविविधता पार्क याविषयी मार्गदर्शन त्यांनी केले. ए आर इ ए एस फाउंडेशन चे मा. सुशांत रणशूर यांनी सापांसोबत सहअस्तित्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, सापांकडे बघण्याचा दृष्टिकोन, समाजामध्ये भरलेली अंधश्रद्धा, साप ओळखण्याची पद्धत, सर्पदंश व त्यापासून च्या उपायोजना यांची प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन रूपाली घुगे, प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ पवनसिंग परदेशी, प्रमुख पाहुण्यांचा परिचय व आभार डॉ. आरती छाजेड यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रासयो कार्यक्रमाधिकारी डॉ पवन सिंग परदेशी, डॉ.आरती छाजेड यांच्यासह एन एस एस स्वयंसेवक, स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे वाणिज्य मंडळ अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती,  मनमाड कार्यपद्धती या विषयावर व्याख्यान संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे वाणिज्य मंडळ अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, मनमाड कार्यपद्धती या विषयावर व्याख्यान संपन्न

दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय...

read more
“ म्युकर मायकोसिस ” या जीवघेण्या आजारातून डॉक्टरांनी वाचवले रुग्णाचे प्राण –  शर्थीचे प्रयत्न ठरले यशस्वी

“ म्युकर मायकोसिस ” या जीवघेण्या आजारातून डॉक्टरांनी वाचवले रुग्णाचे प्राण – शर्थीचे प्रयत्न ठरले यशस्वी

वेळीच रुग्णाचे लक्षणं बघून क्षणाचाही विलंब न करता तात्काळ उपचार सुरु केल्याने रुग्णाचे प्राण...

read more
नांदगाव शहरात साकार होत असलेल्या शिवसृष्टी चे काम प्रगती पथावर – आमदार कांदे यांनी केली पाहणी

नांदगाव शहरात साकार होत असलेल्या शिवसृष्टी चे काम प्रगती पथावर – आमदार कांदे यांनी केली पाहणी

नांदगाव शहरात साकार होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टी च्या...

read more
माता आणि बाल सुरक्षेसाठी मोदी सरकारचा स्तुत्य उपक्रम, किलकारी योजना:- डॉ भारती पवार

माता आणि बाल सुरक्षेसाठी मोदी सरकारचा स्तुत्य उपक्रम, किलकारी योजना:- डॉ भारती पवार

गुजरात आणि महाराष्ट्रातील स्थानिक भागातील लाभार्थ्यांसाठी किलकारी या फिरत्या आरोग्य (एम-हेल्थ)...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]