loader image
[ays_poll id=7]

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

Jan 21, 2026

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत अभिनव बाल विकास मंदिर ने आपल्या देदीप्यमान यशाची आणि १००% निकालाची परंपरा यावर्षीही जपली आहे.

दि. १० जानेवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या या निकालात विद्यालयाचे एकूण 45 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयातील एलिमेंटरी परीक्षेस 22 विद्यार्थी

A ग्रेड-०3

B ग्रेड-07

C ग्रेड-12

निकाल – १००%

तर इंटरमिजिएट परीक्षेस 23 विद्यार्थी

A ग्रेड-02

B ग्रेड-4

C ग्रेड-17

निकाल-१००%

विद्यालयाच्या या यशाबद्दल म.वि.प्र. संचालक इंजि.अमित बोरसे पाटील (नांदगाव) यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष कौतुक केले आहे. या यशात शाळेचे कला शिक्षक एस. डी कदम सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि ग्रामस्थांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. चित्रकला क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे यश प्रेरणादायी ठरणार आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.