loader image
[ays_poll id=7]

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

Feb 12, 2026


 

शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पालकांसाठी मार्गदर्शनसभा आयोजित करण्यात आली होती.चर्चासत्राचे प्रास्ताविक प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे यांनी मांडले तर बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 व 2011 यातील कलम 12 (1) (सी) नुसार 25% जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुलांमुलींसाठी राखीव ठेवण्याच्या असलेल्या तरतुदीबाबत व प्रवेशप्रक्रियेबाबत तसेच शालेय शिक्षण विभाग यांच्या अधिसुचना व परिपत्रकातील तरतूदीबाबत तपशिलवार माहिती शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर यांनी उपस्थित पालकांना दिली.

सदर प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन राबविण्याबाबत शासनाकडून वेळापत्रक लवकरच जाहिर झाल्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबवली जाईल. पालकांनी ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरावयाचे आहेत.

25% प्रवेशासाठी वंचित घटक जसे एस.सी., एस.टी, व्हि.जे., एन.टी., ओबीसी, एस.बी.सी. इत्यादी प्रवर्गाचा समावेश आहे व दुर्बल घटकासाठी खुला प्रवर्ग व अल्पसंख्यांक शिवाय दिव्यांग विदयार्थी इत्यादींचा समावेश आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी जन्माचे प्रमाणपत्र व वास्तवाचा पुरावा तसेच बालकाचे दि.31 डिसेंबर रोजी 6 वर्ष वय प्रवेशास पात्र आहे. वंचित घटकांतील प्रवर्गासाठी पालकांचे जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे. तर दुर्बल घटकांतील विदयार्थ्यांकरीता 1 लाखापेक्षा कमी असलेले कायदयात नमूद सक्षम आधिका-याचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. दिव्यांग विदयार्थ्यांकरीता 40% पेक्षा जास्त अपंगत्वाचे समक्ष आधिका-याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. याशिवाय घटस्फोटीत आई, विधवा महिला, अनाथ बालके, कोव्हीडबाथीत व एचआयव्ही बाधीत बालके यांच्यासाठीही कायदयात नमुद कागदपत्रांप्रमाणे प्रवेश अर्ज करता येईल.

पालकांनी वरीलप्रमाणे विहीत मुदतीत प्रवेशप्रक्रिया पुर्ण करावी. पालकांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्यास प्रवेश रद्द होतील याची नोंद घ्यावी. ऑनलाईन पध्दतीने मुदतीत अर्ज भरल्यानंतर सोडत पध्दतीने प्रवेश मिळालेल्या पालकांनी विहीत मुदतीत पडताळणी समितीकडून पडताळणी करून आपापले प्रवेश दिलेल्या मुदतीतच निश्चित करावेत. तसेच अधिक माहितीसाठी वेळोवेळी शासन परिपत्रक, अध्यादेश काळजीपुर्वक पहावेत व संपुर्ण प्रवेशप्रक्रियेस शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेले शासननिर्णय, त्यातील नियम व अटी अंतिम व बंधनकारक असतील असे श्री. मुकेश मिसर यांनी नमूद केले. तरी वंचित व दुर्बल घटकातील पात्र बालकांच्या पालकांनी सदर प्रवेशप्रक्रियेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. मुकेश मिसर यांनी केले.

सदर प्रवेशप्रक्रिया संपुर्णपणे ऑनलाईन व लॉटरी पध्दतीने आहे. प्रवेश मिळणे अथवा अपात्र ठरणे यासाठी मुख्याध्यापक, शालेय प्रशासन, संस्था व संबंधित शिक्षणविभाग जबाबदार नाही याची पालकांनी नोंद घ्यावी. पालकांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे श्री. राम महाले यांनी दिले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. वैभव कुलकर्णी, श्री. धनंजय निंभोरकर, सौ. एस्तेर क्षिरसागर व श्रीमती गायत्री मिश्रा यांच्यासह इतर शिक्षक-शिक्षिका यांचे सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
.