loader image
[ays_poll id=7]

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

Feb 18, 2026


मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध असून हे स्वप्न साकार करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करू; आवश्यकता भासल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली तरी मी पत्रकारांसोबत ठामपणे उभा राहीन, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी केले. सध्याच्या काळात पत्रकारितेतील मूल्यांची घसरण, पत्रकारांचा कमी होत चाललेला सन्मान आणि सामाजिक बांधिलकीची हरवलेली जाणीव याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यात पत्रकार शिक्षण व संशोधनासाठी ‘पत्र प्रबोधिनी’ला पुन्हा चालना देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पत्रकार दिनानिमित्त नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने पल्लवी मंगल कार्यालय, दै. जनश्रद्धाचे संस्थापक संपादक जेष्ठ पत्रकार पत्रमहर्षी स्व. कांतीलाल गुजराथी पत्रनगरी येथे आयोजित पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक होते. यावेळी नाशिक विभागीय सचिव तथा नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल खरे, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष मोतीराम पिंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर कदम, तसेच जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, अशोक परदेशी, जगन पाटील, सतीश शेकदार मंचावर उपस्थित होते.

महापुरुषांना पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना भास्कर कदम यांनी पूर्वीच्या आणि आताच्या पत्रकारितेतील तफावत अधोरेखित करत पत्र प्रबोधिनीच्या नव्या कार्याची ठिणगी नांदगाव-मनमाड तालुक्यातून पडल्याचे सांगितले. परिषदेकडून या कार्याला पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोतीराम पिंगळे यांनी पत्रकारांना संघटित करून पत्र प्रबोधिनीच्या कार्याला लवकरच गती देण्याचा मानस व्यक्त केला. अमोल खरे यांनी पत्रकार संघाच्या गेल्या काही वर्षांतील वाटचालीचा आढावा घेत पत्रकार विद्यापीठासाठी परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. स्वाती गुजराथी यांनी पत्रकारितेचा दर्जा घसरत चालल्याची खंत व्यक्त करत दर्जेदार पत्रकारितेची गरज अधोरेखित केली.

यावेळी गुणवंत पत्रकारांचा सन्मान किरण नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ठिणगीचे संस्थापक संपादक स्व. प्रकाश गोयल यांच्या स्मरणार्थ गोयल परिवार व कंचन ज्वेलर्स यांच्या वतीने देण्यात येणारे जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ पत्रकार संदीप देशपांडे, जहुर खान, नरहरी उंबरे, सोमनाथ घोंगाणे आणि प्रा. सुरेश नारायणे यांना प्रदान करण्यात आले.

मानपत्राचे वाचन प्रिया परदेशी, जनार्दन देवरे, बाबासाहेब बोरसे, आम्रपाली वाघ आणि राजू लहिरे यांनी केले. कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष उपाली परदेशी आणि आनंद बोथरा यांनी केले, तर संघटक अशोक बिदरी यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरचिटणीस निलेश वाघ, तुषार गोयल, तालुकाध्यक्ष संदीप जेजुरकर, रुपाली केदारे, गणेश केदारे, योगेश म्हस्के, राजेंद्र धिंगाण, बापू मार्कंड, ज्ञानेश्वर दुकळे, रामदास सोनवणे, सचिन मालपाणी, प्रणव हरकल, विशाल मोरे, अनिल निरभवणे, यांसह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य माणिकराव कवडे यांचेकडून नवनियुक्त कृ.उ.बाजार समिती सदस्य व मविप्र संचालक अमित बोरसे यांचा सत्कार

जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य माणिकराव कवडे यांचेकडून नवनियुक्त कृ.उ.बाजार समिती सदस्य व मविप्र संचालक अमित बोरसे यांचा सत्कार

नांदगाव सोमनाथ घोगांणे येथील जेष्ठ नागरिक संघाने आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव...

read more
शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट  आऊट स्टँडींग अवॉर्ड

शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट आऊट स्टँडींग अवॉर्ड

अनेकांनी स्वप्न पाहिलेले असते की परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं मात्र हे स्वप्न सत्यात उतरवणे...

read more
दिड वर्षाच्या बाळाला मण्यार जातीच्या सापाचा चावा – डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने वाचले चिमुकल्याचे प्राण

दिड वर्षाच्या बाळाला मण्यार जातीच्या सापाचा चावा – डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने वाचले चिमुकल्याचे प्राण

दीड वर्षाचे बाळ आपल्या आईच्या कुशीत शांत झोपला असताना रात्रीच्या अंधारात सळसळणारा मण्यार जातीचा...

read more
मनमाड जळगाव स्थानकादरम्यान १४,१५ ऑगस्ट रोजी मेगब्लॉक – अनेक गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात बदल

मनमाड जळगाव स्थानकादरम्यान १४,१५ ऑगस्ट रोजी मेगब्लॉक – अनेक गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात बदल

मनमाड-जळगाव स्थानकादरम्यान मेगाब्लॉकमुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून या काळात प्रवाशांना...

read more
नवक्रांतीची ज्योत तेवत ठेवा ,क्रांती दिनी निर्धार नवक्रांती युवक सघांचा ५ वा वर्धापन दिन उत्सवात साजरा

नवक्रांतीची ज्योत तेवत ठेवा ,क्रांती दिनी निर्धार नवक्रांती युवक सघांचा ५ वा वर्धापन दिन उत्सवात साजरा

नांदगाव प्रतिनिधी देशावर,राज्यावर बोलण्यापेक्षा गावावर बोला आणि क्रांतीदिन साजरा करतांना ज्या...

read more
.