Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो,उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर कुमारी सांस्कृती नितीन देवकर व कुमार रुद्र सचिन इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर श्रीमती अंजेलिना झेवियर मॅडम व अशोक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गायक वृंदाने, ‘सर्वात्मका शिवसुंदरा’ हे कुसुमाग्रज लिखित प्रार्थनागीत सादर केले. कुमार रुद्र सचिन इंगळे याने आपल्या भाषणातून मराठी भाषेचे वैभव सांगितले. कुमारी संस्कृती नितीन देवकर हिने आपल्या भाषणातून कुसुमाग्रजांच्या साहित्याचा थोडक्यात आढावा घेतला.

मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचे महत्व तसेच वि.वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकाचे साहित्यिक मूल्य सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कुमारी बेबी राजेंद्र पगारे हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी समृद्धी रावसाहेब नाईकवाडे हिने केले.

अजून बातम्या वाचा..

मराठी भाषा दिनानिमित्त       गंगाधरी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी बाल साहित्यिक संदीप देशपांडे यांनी साधला ऑनलाईन संवाद

मराठी भाषा दिनानिमित्त गंगाधरी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी बाल साहित्यिक संदीप देशपांडे यांनी साधला ऑनलाईन संवाद

मराठी भाषा दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती गंगाधरी येथे लेखक तुमच्या भेटीला हा...

read more
बघा व्हिडिओ – राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आटोपून परततांना विद्यार्थ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात – २२ विद्यार्थी जखमी

बघा व्हिडिओ – राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आटोपून परततांना विद्यार्थ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात – २२ विद्यार्थी जखमी

अमरावतीत राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या शिबिरातून परतत असलेल्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या ट्रॅक्‍टरला अपघात...

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघ आयोजित ‘मातीचे-गड किल्ले बनविने’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न…

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघ आयोजित ‘मातीचे-गड किल्ले बनविने’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न…

मनमाड : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास मराठी भाषा दिना निमित्ताने नामदेवराव गिडगे यांचे कडून रुपये 15000/-किंमतीची ग्रंथ/पुस्तके भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास मराठी भाषा दिना निमित्ताने नामदेवराव गिडगे यांचे कडून रुपये 15000/-किंमतीची ग्रंथ/पुस्तके भेट

मनमाड शहराचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन शतकोत्तर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]