Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो,उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर कुमारी सांस्कृती नितीन देवकर व कुमार रुद्र सचिन इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर श्रीमती अंजेलिना झेवियर मॅडम व अशोक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गायक वृंदाने, ‘सर्वात्मका शिवसुंदरा’ हे कुसुमाग्रज लिखित प्रार्थनागीत सादर केले. कुमार रुद्र सचिन इंगळे याने आपल्या भाषणातून मराठी भाषेचे वैभव सांगितले. कुमारी संस्कृती नितीन देवकर हिने आपल्या भाषणातून कुसुमाग्रजांच्या साहित्याचा थोडक्यात आढावा घेतला.

मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचे महत्व तसेच वि.वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकाचे साहित्यिक मूल्य सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कुमारी बेबी राजेंद्र पगारे हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी समृद्धी रावसाहेब नाईकवाडे हिने केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाड सार्वजनिक वाचनालयात  संस्कार खेळवाडीतील चिमुकल्याची ग्रंथ भेट सहल संपन्न

बघा व्हिडिओ – मनमाड सार्वजनिक वाचनालयात संस्कार खेळवाडीतील चिमुकल्याची ग्रंथ भेट सहल संपन्न

मनमाड सार्वजनिक वाचनालयात संस्कार खेळवाडीतील चिमुकल्याची ग्रंथ भेट सहल संपन्न आज मनमाड शहरातील...

read more
पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्यार्यांना कडक शासन व्हावे – नांदगाव मनमाड पत्रकार संघाचे निवेदन

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्यार्यांना कडक शासन व्हावे – नांदगाव मनमाड पत्रकार संघाचे निवेदन

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्त्या करणाऱ्यांना कडक शासन व्हावे. पत्रकार संरक्षण...

read more
नांदगाव तालुक्यातील विविध तांड्यांवर संत श्री सेवालाल जयंती साजरी – सौ. अंजुम कांदे यांची उपस्थिती

नांदगाव तालुक्यातील विविध तांड्यांवर संत श्री सेवालाल जयंती साजरी – सौ. अंजुम कांदे यांची उपस्थिती

संत श्री सेवालाल महाराज जयंती निमित्त आज सौ.अंजुमताई कांदे यांनी विविध तांड्यांवर उपस्थित राहून...

read more
बघा व्हिडिओ – येवला येथे मद्यधुंद वाहन चालकाने अनेक वाहनांना चिरडले – एका युवकाचा मृत्यू

बघा व्हिडिओ – येवला येथे मद्यधुंद वाहन चालकाने अनेक वाहनांना चिरडले – एका युवकाचा मृत्यू

मंगळवारी एका मद्यधुंद वाहन चालकाने कोपरगाव ते मनमाडचे दिशेने जाताना अनेक वाहनांना धडक देत झालेल्या...

read more
रेल्वे अपघातात मृत्यमुखी पडलेल्या चार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एन.आर.एम.यु तर्फे प्रत्येकी एक लाखाची मदत

रेल्वे अपघातात मृत्यमुखी पडलेल्या चार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एन.आर.एम.यु तर्फे प्रत्येकी एक लाखाची मदत

पुसलेल्या कुंकूवाचं मोल आम्ही काय करणार ? मदत नव्हे जगण्याला बळ देण्याचा अल्पसा प्रयत्न ....! 13...

read more
बघा व्हिडिओ – सोशल मीडियावर सध्या एका झेलचीच चर्चा – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी घेतली दखल

बघा व्हिडिओ – सोशल मीडियावर सध्या एका झेलचीच चर्चा – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी घेतली दखल

सोशल मीडियावर सध्या एका झेलची चर्चा होत आहे. सचिन तेंडुलकरसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनाही या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]