Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो,उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर कुमारी सांस्कृती नितीन देवकर व कुमार रुद्र सचिन इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर श्रीमती अंजेलिना झेवियर मॅडम व अशोक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गायक वृंदाने, ‘सर्वात्मका शिवसुंदरा’ हे कुसुमाग्रज लिखित प्रार्थनागीत सादर केले. कुमार रुद्र सचिन इंगळे याने आपल्या भाषणातून मराठी भाषेचे वैभव सांगितले. कुमारी संस्कृती नितीन देवकर हिने आपल्या भाषणातून कुसुमाग्रजांच्या साहित्याचा थोडक्यात आढावा घेतला.

मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचे महत्व तसेच वि.वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकाचे साहित्यिक मूल्य सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कुमारी बेबी राजेंद्र पगारे हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी समृद्धी रावसाहेब नाईकवाडे हिने केले.

अजून बातम्या वाचा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्या विरोधात मनमाड शहर काँग्रेसकडून मांफी मागो आंदोलन .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्या विरोधात मनमाड शहर काँग्रेसकडून मांफी मागो आंदोलन .

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्या विरोधात मनमाड शहर काँग्रेसकडून काल मांफी मागो आंदोलन...

read more
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत समर्थ महिला बचत गटाची बैठक व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत समर्थ महिला बचत गटाची बैठक व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

मनमाड शहरातील गोपाळनगर येथील समर्थ महिला गट दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका योजना...

read more
मनमाड लासलगाव रोड वरील खुनाच्या घटनेतील आरोपीस २४ तासात अटक : चांदवड पोलिसांची कामगिरी

मनमाड लासलगाव रोड वरील खुनाच्या घटनेतील आरोपीस २४ तासात अटक : चांदवड पोलिसांची कामगिरी

दोन दिवसांपूर्वी मनमाड लासलगाव रोडवर वाघदर्डी धरणाजवळ पडीत जागेवर चांदवड तालुक्यातील पिंपळगाव...

read more
मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिका बहुजन कष्टकरी विद्यार्थ्यांचे ज्ञान केंद्र बनावे : गायिका कडूबाई खरात

मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिका बहुजन कष्टकरी विद्यार्थ्यांचे ज्ञान केंद्र बनावे : गायिका कडूबाई खरात

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने सुरू असलेले भारतरत्न डॉ....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]