loader image
[ays_poll id=7]

ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा

Feb 28, 2026


एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध प्रकारच्या तिकिटांमध्ये सवलती राज्य परिवहन महामंडळाकडून दिल्या जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना हाफ तिकीट प्रवास तर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास अशा योजना आहेत. पण या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्वांना आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) बंधनकारक करण्यात आल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतंच जाहीर केलं होतं. त्यानंतर याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. पण आता शासनानं यावरुन युटर्न घेतला असून मोठा खुलासा केला आहे.

राज्य परिवहन महामंडळानं ट्विटद्वारे माहिती दिली की, NCMC स्मार्टकार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरु झाली आहे. तथापि, एसटी प्रवासात या स्मार्टकार्डची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही. कृपया सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. एसटीचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी ही माहिती दिली आहे.

 


अजून बातम्या वाचा..

अपबिट प्रॉडक्शन्स, फिदरटच स्टुडिओ आणि गौर द ब्रॅण्ड निर्मित नव्याकोऱ्या प्रेमगीताचा म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न

अपबिट प्रॉडक्शन्स, फिदरटच स्टुडिओ आणि गौर द ब्रॅण्ड निर्मित नव्याकोऱ्या प्रेमगीताचा म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न

अपबिट प्रॉडक्शन्स, फिदरटच स्टुडिओ आणि गौर द ब्रॅण्ड निर्मित नव्याकोऱ्या प्रेमगीताचा म्युझिक लॉन्च...

read more

(बघा व्हिडिओ) एशियन युथ ज्युनिअर सीनिअर वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप: मनमाड च्या आकांक्षा व्यवहारे ला कांस्य पदक

उझबेकिंस्थान ताशकंद येथे संपन्न होत असलेल्या आशियाई युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत 40 किलो वजनी गटात...

read more
लोककवी वामनदादा कर्डक यांचे काव्य-गीते प्रकाशनाकरता उपलब्ध करून देण्याचे आवाहन

लोककवी वामनदादा कर्डक यांचे काव्य-गीते प्रकाशनाकरता उपलब्ध करून देण्याचे आवाहन

महाराष्ट्रभर लोककवी वामनदादा कर्डक यांचे विखुरलेले साहित्य संकलित होत असून महाराष्ट्रात ज्या-ज्या...

read more
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १५ जुलै पासून लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मोफत

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १५ जुलै पासून लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मोफत

कोरोना विरोधी लसीकरणातील महत्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या बुस्टर डोसबाबत केंद्र सरकार ने महत्वाचा...

read more
.