loader image
[ays_poll id=7]

ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा

Feb 28, 2026


एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध प्रकारच्या तिकिटांमध्ये सवलती राज्य परिवहन महामंडळाकडून दिल्या जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना हाफ तिकीट प्रवास तर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास अशा योजना आहेत. पण या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्वांना आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) बंधनकारक करण्यात आल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतंच जाहीर केलं होतं. त्यानंतर याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. पण आता शासनानं यावरुन युटर्न घेतला असून मोठा खुलासा केला आहे.

राज्य परिवहन महामंडळानं ट्विटद्वारे माहिती दिली की, NCMC स्मार्टकार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरु झाली आहे. तथापि, एसटी प्रवासात या स्मार्टकार्डची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही. कृपया सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. एसटीचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी ही माहिती दिली आहे.

 


अजून बातम्या वाचा..

ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ : विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मानले आभार!

ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ : विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मानले आभार!

थंडी, उन, वारा, पाऊस या अस्मानी संकटात मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील ग्राम विद्युत...

read more
आस्थापनांना दंड आकारणी करण्याची तरतूद तत्काळ रद्द करावी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी !

आस्थापनांना दंड आकारणी करण्याची तरतूद तत्काळ रद्द करावी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी !

कोरोनाच्या नव्या संकटाला रोखण्याच्या निमित्ताने राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन नियमावलीमध्ये...

read more
जनावरांची गणना होते, आम्हालाही मोजा : ओबीसी आरक्षणावरून भुजबळांचा केंद्रावर हल्लाबोल !

जनावरांची गणना होते, आम्हालाही मोजा : ओबीसी आरक्षणावरून भुजबळांचा केंद्रावर हल्लाबोल !

आपल्या खास शैलीतील शेरोशायरी साठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी आज देखील...

read more
विलीनीकरणाच्या मागणीवर संघटना ठाम : एसटी कर्मचारी संप सुरूच

एस.टी.कर्मचारी आंदोलन : विलीनीकरणाच्या मागणी वर ठाम – आज निर्णय होण्याची शक्यता !

राज्य शासनाने इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ जाहीर केल्यानंतर सुध्दा कामगार विलीनीकरणाच्या मागणीवर...

read more
.