loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो,उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर कुमारी सांस्कृती नितीन देवकर व कुमार रुद्र सचिन इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर श्रीमती अंजेलिना झेवियर मॅडम व अशोक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गायक वृंदाने, ‘सर्वात्मका शिवसुंदरा’ हे कुसुमाग्रज लिखित प्रार्थनागीत सादर केले. कुमार रुद्र सचिन इंगळे याने आपल्या भाषणातून मराठी भाषेचे वैभव सांगितले. कुमारी संस्कृती नितीन देवकर हिने आपल्या भाषणातून कुसुमाग्रजांच्या साहित्याचा थोडक्यात आढावा घेतला. मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचे महत्व तसेच वि.वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकाचे साहित्यिक मूल्य सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कुमारी बेबी राजेंद्र पगारे हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी समृद्धी रावसाहेब नाईकवाडे हिने केले.

अजून बातम्या वाचा..

मा.तात्यासाहेब साहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,उमराने येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

मा.तात्यासाहेब साहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,उमराने येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

  उमराने:-श्री. गणेश शिक्षण मंडळ संचलित मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व...

read more
कै पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊसाठे जयंती उत्साहात साजरी…

कै पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊसाठे जयंती उत्साहात साजरी…

  नांदगाव पिंपरखेड येथे आज रोजी विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊसाठे...

read more
भगवान महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलाचे नूतनीकरण – सौ.अंजुम कांदे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न

भगवान महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलाचे नूतनीकरण – सौ.अंजुम कांदे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून मनमाड येथील भगवान महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलाचे...

read more
मनमाड वासीयांना सुखद बातमी : शहरात उभारले जाणार तीन जलकुंभ तर करंजवण येथील जॅकवेल चे १५ मीटर काम पूर्णत्वाकडे

मनमाड वासीयांना सुखद बातमी : शहरात उभारले जाणार तीन जलकुंभ तर करंजवण येथील जॅकवेल चे १५ मीटर काम पूर्णत्वाकडे

मनमाड शहरासाठी जीवनदायी ठरणारी करंजवण योजनेचे काम प्रगतीपथावर असून करंजवण धरणातील पाणीसाठ्यात वाढ...

read more
मणिपूर घटनेचा मनमाड शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे निषेध – आरोपींना फाशी देण्याची मागणी

मणिपूर घटनेचा मनमाड शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे निषेध – आरोपींना फाशी देण्याची मागणी

मणिपूर राज्यात दोन महिलांची नग्न हिंड काढत त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केल्याच्या घटनेच्या नीच...

read more
.