loader image
[ays_poll id=7]

मनमाडला अंडरपास व फ्लायओवरची अत्यंत गरज : आ.कांदे यांची रेल्वे बोर्डाला मागणी

Mar 1, 2026

मनमाड- दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सुहास कांदे यांनी रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली येथील कार्यकारी निदेशक (बी अँड एस)-1 मा. अभिमन्यु लोबा यांना मनमाड शहरातील वाढत्या वाहतूक समस्येबाबत सविस्तर निवेदन सादर केले.

मनमाड जंक्शन हे मध्य रेल्वेचे अत्यंत महत्त्वाचे केंद्रबिंदू असून, दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी व वाहने येथे ये-जा करतात. शहराच्या पूर्व व पश्चिम भागांना जोडणारा पुराणा रेल्वे पूल नागरिकांसाठी मोठी अडचण ठरत असून, येथे सतत वाहतुकीची कोंडी, वेळेचा अपव्यय तसेच ॲम्बुलन्स व अग्निशमन सारख्या आपत्कालीन सेवांना गंभीर अडथळा निर्माण होत असल्याचे आमदार कांदे यांनी निवेदनात स्पष्ट केले.

शहराचा वेगाने वाढता विस्तार आणि भविष्यातील ट्रॅफिकचा विचार करता, ही समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे मनमाडकरांना सुरक्षित व सुगम मार्ग उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

आ. कांदे यांनी केलेल्या प्रमुख मागण्या :

१) मनमाड रेल्वे जंक्शनच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला स्वतंत्र अंडरपास तातडीने बांधकाम करावे.

२) भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून रेल्वे लाईनच्या वर फ्लायओवर उभारण्याची योजना प्राधान्याने हाती घ्यावी.

ही कामे मनमाड शहराच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असून, नागरिकांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठीही अत्यंत महत्त्वाची असल्याचा पुनरुच्चार त्यांनी निवेदनाद्वारे केला.

रेल्वे बोर्डाने या संदर्भात सकारात्मक पावले उचलून तातडीने कार्यवाही करावी, अशी मांगणी आमदार सुहास (आण्णा) कांदे यांनी केली असताना मा. अभिमन्यू लोबा यांनी रेल्वे बोर्डाच्या इतर सदस्य ची चर्चा करून लवकरच या विषयात उचित कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

या प्रसंगी नगराध्यक्ष योगेश पाटील, शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, नगरसेवक माजिद शेख, आझाद पठाण, लाला नागरे, लोकेश साबळे, सनी स्वामी, आसिफ पठाण, निलेश व्यवहारे आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

संघ शाखांचे काम मोठ्या प्रमाणात उभे करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच – चिरंजीव सानप

संघ शाखांचे काम मोठ्या प्रमाणात उभे करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच – चिरंजीव सानप

आज रा स्व संघ मनमाड शाखेचा वर्ष प्रतिपदा उत्सव साजरा झाला. प्रमुख वक्ते म्हणून मालेगांव येथील...

read more
कोंढार येथील विठ्ठल रखुमाई मंदिरा साठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याकडून तात्काळ सभामंडप मंजूर

कोंढार येथील विठ्ठल रखुमाई मंदिरा साठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याकडून तात्काळ सभामंडप मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आज कोंढार येथील विठ्ठल रखुमाई मंदिरासाठी तात्काळ सभामंडप मंजूर केला...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयाने मराठी नववर्ष निमित्ताने उभारली मराठी पुस्तकांची गुढी

मनमाड सार्वजनिक वाचनालयाने मराठी नववर्ष निमित्ताने उभारली मराठी पुस्तकांची गुढी

मनमाड शहाराच्या साहित्य ,सांस्कृतिक, सामाजिक,शैक्षणिक,क्षेत्रात मानाचे स्थान असणाऱ्या आणि व्रत...

read more
अंगणवाडीत बालकांचे श्रेणीवर्धन होण्यासाठी राबविले जात आहे मार्गदर्शन सत्र- शितल गायकवाड मुख्य सेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

अंगणवाडीत बालकांचे श्रेणीवर्धन होण्यासाठी राबविले जात आहे मार्गदर्शन सत्र- शितल गायकवाड मुख्य सेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२. अंगणवाडी क्र.७५. जमदाडे चौक. मनमाड विभाग.....

read more
देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नवीन नियम बनवत आहे, 300 उत्पादने हॉलमार्किंगच्या कक्षेत आणणार आहेत

देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नवीन नियम बनवत आहे, 300 उत्पादने हॉलमार्किंगच्या कक्षेत आणणार आहेत

हॉलमार्किंग: सिगारेट, लायटर, पेन आणि घरगुती इलेक्ट्रिकल वस्तू यासारखी उत्पादने नवीन नियमांचे पालन...

read more
खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड

खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड

बेंगलोर येथे होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय मानांकन वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी...

read more
.