loader image
[ays_poll id=7]

मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न

Mar 2, 2026

मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी उत्साहात संपन्न झाली. या सोहळयाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री.सदाशिव सुतार सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मनमाडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री.योगेश पाटील उपस्थित होते.

सेंट झेवियर्स हायस्कूलची कु.श्रद्धा शिंदे हि ने प्रथम पुरस्कार (११००/- रु. रोख,सन्मानचिन्ह व गौरवपत्र), द्वीतीय पुरस्कार(७००/- रु. रोख, सन्मानचिन्ह व गौरवपत्र) कवी रविंद्रनाथ टागोर शाळेच्या कु. श्रावणी खैरनार तर तृतीय पुरस्कार (५००/- रु. रोख, सन्मानचिन्ह, गौरवपत्र)छत्रे न्यू इंग्लिश स्कूलच्या कु. आदिती पाटील हिने पटकाविला.

या स्पर्धेत कवी रविंद्रनाथ टागोर शाळेच्या कु.सई शाकद्वीपी व आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूलच्या कु. नम्रता पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक(२००/- रु. रोख, सन्मानचिन्ह, गौरवपत्र) देण्यात आले. छत्रे न्यू इंग्लिश स्कुलच्या कु.वैष्णवी सानप हिच्या कवितेस लक्षवेधी बाल- कुमार कवयित्री हा विशेष पुरस्कार देण्यात आला.

या काव्यस्पधेचे परीक्षक म्हणून कवयित्री सौ.मंदोदरी पाटील, कवी श्री.प्रदीप गुजराथी व युवाकवी श्री.शांताराम वाघ यांनी काम पाहिले.

कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमापुजनाने मान्यवरांच्या हस्ते या काव्यस्पर्धा पारितोषिक वितरण समारंभाचा शुभारंभ करण्यात आला. युवा गायक आर्यन जोगदंड याने शुभारंभ प्रसंगी मराठी भाषा गौरवगीत गायन केले.

शहरातील दोनशेहून अधिक शालेय बाल-कुमार कवी कवयित्रींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी अंतिम फेरीसाठी चौदा बाल-कुमार कवीच्या कवितांची निवड कविता सादरीकरणासाठी करण्यात आली होती.

मनमाड साहित्य संघाचे कार्यवाहक अमोल खरे यांनी याप्रसंगी प्रास्ताविक केले. मनमाड साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ.रविन्द्र सुर्वे, कवी डी.डी.पाटील, डी.टी.पवार, संघाचे मार्गदर्शक पत्रकार नरेश गुजराथी, प्रा. जे.वाय.इंगळे कवी संदीप देशपांडे, राम महाले, नगरसेवक विशाल आहिरे आदी मान्यवर याप्रसंगी मंचावर उपस्थित होते.

हेमंत वाले, उपाली परदेशी, सुरेंद्र भुजंग, प्रिया परदेशी, भाऊसाहेब दाभाडे यांनी कार्यकमाचे संयोजन केले तर मनमाड साहित्य संघाचे सचिव कवी जनार्दन देवरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन केले. कार्यक्रमास विविध शाळांचे मुख्याध्यापक, समन्वयक शिक्षक,पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.