loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर शिवसेनेची MSEB कार्यकारी अभियंता कार्यालयात शहर पोलीस स्टेशन व MSEB अधिकाऱ्यासोबत संयुक्त बैठक…

Jun 26, 2026

मनमाड : मनमाड शहरात गेल्या महिनाभरापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून अनेक वेळा तासन्तास वीज गायब राहत आहे. यामुळे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व व्यावसायिक वर्गाला मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने मनमाडकरांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेना मनमाड शहराच्या वतीने कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग मनमाड यांना आंदोलनाचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनामध्ये शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी पोलिस निरीक्षक विजय करे साहेब, असिस्टंट पोलीस निरीक्षक भंगाळे साहेब ही आंदोलनामुळे मनमाड शहरातील कायदा सुव्यवस्थेसाठी उपस्थित होते. संतापलेल्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी तत्काल आंदोलनाची हाक देऊ नये अशी विनंती नवनियुक्त कार्यकारी अभियंता प्रजापती साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता करेरा साहेब, उप कार्यकारी अभियंता नलावडे साहेब, तसेच शहर अभियंता कुमावत साहेब, सहाय्यक शहर अभियंता दत्तात्रेय सांगळे यांच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांनी केली सदरील अभियंता यांनी नुकतेच शहरात पदभार स्वीकारला असल्याने त्यांना अडीअडचणी सोडवण्यास वेळ द्यावा अशी विनंती MSEB अधिकाऱ्यांनी व पोलीस प्रशासनाने शिष्ट मंडळाला केली. सदरील विनंतीस मान देऊन त्यांना परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला.

यामध्ये २४ तास कार्यरत तक्रार निवारण केंद्र सुरू करून स्वतंत्र मोबाईल क्रमांक उपलब्ध करणे, विभाग १ व २ मधील देखभाल कामांची माहिती जाहीर करणे, हुडको व इतर फिडर्सच्या वीजखंडित कालावधीचा तपशील देणे, मुख्य बाजारपेठ, दवाखाने व शाळांचा परिसर पाकीजा वाहिनीवर जोडणे, घरगुती ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती न करणे, स्मार्ट मीटरच्या बिल दुरुस्तीची प्रकरणे तातडीने निकाली काढणे, नवीन उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करणे, तसेच वागदर्डी फिडर व ३३ केव्ही लिंक लाईन संदर्भातील विविध तांत्रिक मागण्या करण्यात आल्या आहेत.

शिवसेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, मनमाडकर जनतेच्या हिताच्या या सर्व मागण्यांवर तात्काळ निर्णय घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. अन्यथा आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर जनतेसोबत तीव्र जनआंदोलन उभारेल. तसेच आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या बैठकीतील चर्चेमध्ये शिवसेना मनमाड शहराचे शहरप्रमुख मयूर बोरसे, नगराध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा उपप्रमुख सुनिल हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, जिल्हा संघटक नाना शिंदे, नगरसेवक अमजद पठाण, दिनेश घुगे, रत्नदीप पगारे, लोकेश साबळे, युवासेना शहराधिकारी आसिफ शेख, निलेश ताठे, मुकुंद झाल्टे, राजेंद्र जाधव, सचिन दरगुडे, सनी पगारे, सतीश भुरे, ऋषिकांत आव्हाड, सनी बागुल, रवी चव्हाण, जाकीर शेख, राकेश ताठे, निलेश व्यवहारे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

[contact-field...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
.