Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

Jul 14, 2026

कर्तव्य, निष्ठा आणि भक्ती यांचा अनोखा संगम साधत मनमाड येथील मनमाड सायकलिस्ट ने १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत ‘रॉयल रायडर्स’*व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन च्या सोबतीने नाशिक ते पंढरपूर अशी ३८० किलोमीटरची *सायकल वारी यशस्वीरित्या पूर्ण केली.

दिवस पहिला: नाशिक ते अहिल्यानगर – भक्तीला पंख
वारीला १० जुलै रोजी सकाळी ५:३० वाजता नाशिक येथे‘फ्लॅग ऑफ’ करण्यात आला. पहिल्याच दिवशी सिन्नर घाट हे मोठे आव्हान होते. जिद्दीच्या बळावर घाट पार करत वारीत सहभागी झालेले सर्व सायकलस्वार सिन्नर येथे पोह्यांचा नाश्ता आणि नादुर शिंगोटे येथील हायड्रेशन पॉईंटवर घेतलेल्या अल्प विश्रांतीनंतर पुढे रवाना झाले.
राहुरी येथे दुपारचे जेवण घेतल्यानंतर राहुरी ते अहिल्यानगर हा खडबडीत रस्त्यामुळे सर्वात कठीण टप्पा पार करून सायंकाळी अहिल्यानगर येथे मुक्काम करण्यात आला. घाट चढून विठ्ठलाची मूर्ती दिसताच सर्वांचा थकवा क्षणार्धात नाहीसा झाला.

दिवस दुसरा: अहिल्यानगर ते टेंभुर्णी – जिद्दीची परीक्षा
११ जुलै रोजी पहाटे अहिल्यानगरहून निघालेल्या वारीने तब्बल १६० किलोमीटरचा प्रवास करत टेंभुर्णी येथे मुक्काम केला. ज्ञानबा-तुकाराम आणि विठ्ठल-विठ्ठल च्या जयघोषात आणि रस्त्यात भेटणाऱ्या वारकऱ्यांच्या आशीर्वादाने हा कठीण टप्पा सहज पार पडला.

दिवस तिसरा: टेंभुर्णी ते पंढरपूर – ध्येयपूर्ती
१२ जुलै रोजी सकाळी टेंभुर्णीहून निघून पंढरपूर येथे पोहोचताच श्री विठ्ठलाच्या चरणी लीन होताच ३ दिवसांचा सर्व थकवा नाहीसा झाला. महाराष्ट्रातून आलेल्या सायकल वारकऱ्यांचे भव्यदिव्य सायकल रिंगण बघून डोळ्याचे पारणे फिटले विठूच्या दर्शनाने सर्व सायकलस्वार धन्य झाले.

३ दिवस, ३८० किमी, एकच ध्यास – पंढरी
या वारीत छत्रे विद्यालयाचे माजी प्राचार्य प्रवीण व्यवहारे सिद्धी क्लासेस चे संचालक डॉ.भागवत दराडे, युवा उद्योजक गणेश वाहले, सौ.संगीता कदम, सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ.योगेश मगर,सुप्रसिद्ध डॉ.निलेश हारदे या मनमाडच्या सायकलिस्ट ने ही खडतर मोहीम केवळ जिद्दीच्या जोरावर पार पाडली

वारीनंतर भावना व्यक्त करताना सहभागी म्हणाले, “वारी म्हणजे केवळ चालणे नव्हे, तर तो अंतर्मनाचा प्रवास आहे. पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची भक्ती पाहून आम्हाला खरी प्रेरणा मिळाली. विठ्ठलाच्या ओढीमुळे कठीण वाटलेला प्रवासही आनंददायी झाला.”

ही वारी केवळ एक सायकल वारी मोहीम नसून, शिस्त, आरोग्य आणि भक्ती यांचा मिलाफ असलेली ‘आनंदवारी’ ठरली.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

      मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]