loader image
[ays_poll id=7]

जमिनीचे सर्व अभिलेख आता एकाच प्लॅटफॉर्मवर!’महाभूमी स्टॅक’ प्रणालीचा शुभारंभ!

Sep 2, 2026

महाराष्ट्राच्या महसूल व वन विभागाच्या वतीने जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी ‘महाभूमी स्टॅक’ या एकात्मिक प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. मंत्रालयात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

पूर्वी नागरिकांना ७/१२, भू-नकाशे किंवा खरेदी-विक्री नोंदणीसाठी वेगवेगळ्या संकेतस्थळांचा वापर करावा लागत असे. आता ही सर्व विखुरलेली यंत्रणा एकत्र आणून दहा महत्त्वाच्या सेवांसाठी एकच डिजिटल प्रवेशद्वार उपलब्ध करून देण्यात आले आहे. या महा-डिजिटल भांडारात ३.५ कोटींहून अधिक अधिकार अभिलेख, १.५ कोटीहून अधिक भू-नकाशे व मिळकत पत्रिका, ४० कोटींहून अधिक ऐतिहासिक स्कॅन केलेले फेरफार व जुने अभिलेख तसेच नोंदणी विभागाचे दस्त क्र. २ च्या प्रती व महसूल न्यायालयीन प्रकरणांची अद्ययावत स्थिती उपलब्ध आहे.

या प्रणालीमुळे कोणत्याही जमिनीच्या मालकीहक्काची सविस्तर माहिती एका क्लिकवर तात्काळ मिळणे शक्य होणार आहे. यामुळे जमिनींच्या व्यवहारांतील फसवणुकीस आळा बसण्यासोबतच राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वे मधून धूर निघाल्याने प्रवाशांत घबराट; प्रसंगावधान राखल्याने मोठी हानी टळली

बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वे मधून धूर निघाल्याने प्रवाशांत घबराट; प्रसंगावधान राखल्याने मोठी हानी टळली

मनमाड रेल्वे स्थानकाहून नाशिक कडे जाणाऱ्या नांदेड लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे गाडीच्या एका...

read more
विधिमंडळ हे तर चोर मंडळ ; संजय राऊत यांचे वादग्रस्त विधान – हक्कभंगाची कारवाई होणार ?

विधिमंडळ हे तर चोर मंडळ ; संजय राऊत यांचे वादग्रस्त विधान – हक्कभंगाची कारवाई होणार ?

विधीमंडळ हे तर 'चोर'मंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना गट आणि भाजपवर...

read more
सोशल मीडियावर बंधने तर बँकांच्या कर्ज आणि ईएमआय देतांना मोजावी लागणार जास्त रक्कम – आज पासून झाले बदल

सोशल मीडियावर बंधने तर बँकांच्या कर्ज आणि ईएमआय देतांना मोजावी लागणार जास्त रक्कम – आज पासून झाले बदल

दर महिन्याला आर्थिक बाबतीत काही बदल होत असतात. मार्च महिन्यात सुद्धा काही महत्त्वाचे बदल होणार...

read more
जिल्हा बँकेतील ठेवीदारांच्या रकमा परत मिळाव्यात – भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन करणार ८ मार्च रोजी वस्त्र त्याग धरणे आंदोलन

जिल्हा बँकेतील ठेवीदारांच्या रकमा परत मिळाव्यात – भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन करणार ८ मार्च रोजी वस्त्र त्याग धरणे आंदोलन

मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नाशिक यांच्या कार्यालया समोर नाशिक येथे लोकशाही व अहिंसेच्या...

read more
बघा व्हिडिओ – राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आटोपून परततांना विद्यार्थ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात – २२ विद्यार्थी जखमी

बघा व्हिडिओ – राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आटोपून परततांना विद्यार्थ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात – २२ विद्यार्थी जखमी

अमरावतीत राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या शिबिरातून परतत असलेल्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या ट्रॅक्‍टरला अपघात...

read more
.