loader image
[ays_poll id=7]

जमिनीचे सर्व अभिलेख आता एकाच प्लॅटफॉर्मवर!’महाभूमी स्टॅक’ प्रणालीचा शुभारंभ!

Sep 2, 2026


महाराष्ट्राच्या महसूल व वन विभागाच्या वतीने जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी ‘महाभूमी स्टॅक’ या एकात्मिक प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. मंत्रालयात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

पूर्वी नागरिकांना ७/१२, भू-नकाशे किंवा खरेदी-विक्री नोंदणीसाठी वेगवेगळ्या संकेतस्थळांचा वापर करावा लागत असे. आता ही सर्व विखुरलेली यंत्रणा एकत्र आणून दहा महत्त्वाच्या सेवांसाठी एकच डिजिटल प्रवेशद्वार उपलब्ध करून देण्यात आले आहे. या महा-डिजिटल भांडारात ३.५ कोटींहून अधिक अधिकार अभिलेख, १.५ कोटीहून अधिक भू-नकाशे व मिळकत पत्रिका, ४० कोटींहून अधिक ऐतिहासिक स्कॅन केलेले फेरफार व जुने अभिलेख तसेच नोंदणी विभागाचे दस्त क्र. २ च्या प्रती व महसूल न्यायालयीन प्रकरणांची अद्ययावत स्थिती उपलब्ध आहे.

या प्रणालीमुळे कोणत्याही जमिनीच्या मालकीहक्काची सविस्तर माहिती एका क्लिकवर तात्काळ मिळणे शक्य होणार आहे. यामुळे जमिनींच्या व्यवहारांतील फसवणुकीस आळा बसण्यासोबतच राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


अजून बातम्या वाचा..

विश्व रत्न महामानव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त रेल्वे स्टेशन रिक्षा युनियनच्या वतीने लाडु वाटप

विश्व रत्न महामानव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त रेल्वे स्टेशन रिक्षा युनियनच्या वतीने लाडु वाटप

विश्व रत्न महामानव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त लाडू वाटप चा...

read more
नांदगाव शहरातील जायंट्स वेलफेअर फाउंडेशन आणी जायंटस ग्रुप ऑफ नांदगाव सहेली ग्रुपचा शपथविधी सोहळा संपन्न

नांदगाव शहरातील जायंट्स वेलफेअर फाउंडेशन आणी जायंटस ग्रुप ऑफ नांदगाव सहेली ग्रुपचा शपथविधी सोहळा संपन्न

नांदगाव सोमनाथ घोंगाणे शहरातील जांयटस् वेलफेयर फाउंडेशन 2-बी आणि जायंटस् ग्रुप ऑफ नांदगांव व...

read more
के आर टी शाळेत भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 132 व्या जयंती निमित्त अभिवादन

के आर टी शाळेत भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 132 व्या जयंती निमित्त अभिवादन

विश्वरत्न. विश्वभूषण. भारतरत्न. महाविद्वान.महानायक अर्थशास्त्री. महान इतिहासकार. संविधान निर्मिता....

read more
.