Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

Sep 7, 2026

नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (DMIC) दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांना सविस्तर पत्र पाठवले आहे.
२०१३-१४ मध्ये डीएमआयसीच्या पहिल्या टप्प्याची आखणी होताना नाशिकमध्ये उद्योगांसाठी पाण्याची उपलब्धता आणि आरक्षणाबाबत अडचणी होत्या, हे भुजबळ यांनी पत्रात मान्य केले आहे. मात्र, गेल्या दशकभरात परिस्थिती बदलली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नाशिक हा धरणांचा जिल्हा असल्याचे नमूद करताना केवळ जुन्या कारणांमुळे जिल्ह्याला या प्रकल्पापासून वंचित ठेवता येणार नाही, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. नियोजित औद्योगिक पाणीवाटप, जलसंधारण आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर यांसारख्या उपायांद्वारे पाण्याचा प्रश्न सोडवता येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

भारताचे संविधान हा विषय शाळा-महाविद्यालयात अनिवार्य करण्याच्या निर्णयाचे स्वागत – शरद शेजवळ

भारताचे संविधान हा विषय शाळा-महाविद्यालयात अनिवार्य करण्याच्या निर्णयाचे स्वागत – शरद शेजवळ

येवला (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे,स्वायत्त विद्यापीठे,स्वयं अर्थसाहित...

read more
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना नांदगाव मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना नांदगाव मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री, डॉक्टर भारती पवार यांना नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने...

read more
वंदे भारत एक्स्प्रेस सेमी – हाय स्पीड ए सी चेअर कार ट्रेन सेवेचा हा आहे मार्ग आणि हे आहेत तिकीट दर

वंदे भारत एक्स्प्रेस सेमी – हाय स्पीड ए सी चेअर कार ट्रेन सेवेचा हा आहे मार्ग आणि हे आहेत तिकीट दर

भारतीय रेल्वेची ९वी आणि १०वी वंदे भारत एक्सप्रेस सिद्धेश्वर, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर या...

read more
मै भी डिजिटल 4.0 मोहिमेअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज वितरीत : शहरात कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणार – आमदार कांदे

मै भी डिजिटल 4.0 मोहिमेअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज वितरीत : शहरात कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणार – आमदार कांदे

दि.09/02/2023 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया, मनमाड मुख्य शाखा या कार्यालयात आमदार श्री. सुहास (आण्णा)...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]